शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

‘उम्मीद’मुळे मिळाली जगण्याची उमेद, कॅन्सरवर यशस्वी मात केलेल्या रुग्णांनी केले अनुभवकथन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 03:27 IST

असाध्य आजारांवर मात करणाऱ्या प्रत्येकाला ‘उम्मीद’ या कार्यक्रमामुळे जगण्याची उमेद मिळाली आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला उम्मीद हे नाव समर्पक आहे

डोंबिवली - असाध्य आजारांवर मात करणाऱ्या प्रत्येकाला ‘उम्मीद’ या कार्यक्रमामुळे जगण्याची उमेद मिळाली आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला उम्मीद हे नाव समर्पक आहे, असे मत कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केले.जागतिक कॅन्सर दिनानिमित्त शहरातील एका रुग्णालयातर्फे ‘उम्मीद’ हा कार्यक्रम सोमवारी डोंबिवली जिमखान्यात पार पडला. या वेळी कॅन्सरवर यशस्वी मात केलेल्या रुग्णांनी आपले अनुभव कथन केले. या आजारातून बाहेर पडण्यास बळ आणि धीर दिल्याबद्दल रुग्णांनी डॉक्टर आणि रुग्णालयांतील अन्य कर्मचाºयांचे आभार मानले.यावेळी कल्याण-डोंबिवलीच्या महापौर विनीता राणे, ठाण्याचे उपमहापौर रमाकांत मढवी, स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे, शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे,रु ग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. मिलिंद शिरोडकर, संचालिका संपदा शिरोडकर, माजी नगरसेवक राजन मराठे, नंदू जोशी, मेट्रन राजगोपाल उपस्थित होत्या.डॉ. शिंदे म्हणाले, ‘माणसांकडे किती ही संपत्ती असली तरी त्याचे आरोग्य चांगले नसेल तर संपत्तीचा काहीच उपयोग नाही. कॅन्सरशी लढा देणाºया ९० टक्के रुग्णांना मोफत केमोथेरपी या रुग्णालयातर्फे दिली जाते, ही कौतुकास्पद गोष्ट आहे.’डॉ. सागर गायकवाड या वेळी म्हणाले, रुग्णांवर उपचार करताना डॉक्टरांनी अतोनात प्रयत्न करण्याची गरज आहे, तरच त्यांना यश मिळेल. कॅन्सर हा शत्रू स्ट्राँग आहे. म्हणून त्याच्याशी स्ट्राँगपणे प्रतिकार केला पाहिजे. डॉ. मिलिंद शिरोडकर यांनी, रुग्णालयातील सामग्री उपलब्ध करून दिल्यामुळेच आपण यशस्वीपणे उपचार करू शकलो, असे ते म्हणाले.दरम्यान, कॅन्सरग्रस्त रुग्णांना प्रोटीन्स बॉल, प्रवासी सवलत कार्ड यासह अनेक प्रकारचे उपयोगी साहित्य भेट यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आले. त्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.डॉक्टरांचा केला सत्कारक ॅन्सरवर उपचार करणाºया डॉ. अमित चक्रवर्ती, मेडिकल अर्थीलॉजिस्ट राकेश पाटील, डॉ. सागर गायकवाड, बे्रस्ट कॅन्सर सर्जन यश लोने, डॉ. प्रशांत खडसे,भारत शिंदे, राहुल जानकर, बॉबी सदावर्ती, आशीष चौरसिया, सचिन गुप्ता, पराग तेलवणे, विशाल सकपाळ, जिग्नेश शहा, शिल्पा आगवणी, कनन घरत, सुरेश सोनी या डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला.

टॅग्स :cancerकर्करोगdombivaliडोंबिवली