शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ उपनिरीक्षकांच्या नेमणुकीचा आदेश रद्द; जितेंद्र आव्हाड यांच्याकडून निर्णयाचे स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 08:45 IST

आपल्या गेल्या सात वर्षांच्या पाठपुराव्याला यश आले असून, राज्यातील हजारो पोलिसांच्या पदोन्नती आणि बढत्या आता कायदेशीरीत्या होणार असल्याची माहिती राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात २०१७ मध्ये कोणतीही परीक्षा न घेता थेट ६३६  उमेदवारांची नियुक्ती पोलीस उपनिरीक्षकपदावर होणार होती. या निर्णयामुळे परीक्षा देणाऱ्या उमेदवारांमध्ये मोठा असंतोष होता. अखेर हा निर्णय औरंगाबाद उच्च न्यायालयानेही रद्द केला. 

  आपल्या गेल्या सात वर्षांच्या पाठपुराव्याला यश आले असून, राज्यातील हजारो पोलिसांच्या पदोन्नती आणि बढत्या आता कायदेशीरीत्या होणार असल्याची माहिती राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी शेकडो उमेदवारांनी आव्हाड यांचे अभिनंदन केले.

२०१७ मध्ये ६३६  पोलिसांची थेट उपनिरीक्षक म्हणून नेमणूक करण्याचा आदेश तत्कालीन सरकारने काढला होता. या निर्णयाविरोधात तत्कालीन आमदार जितेंद्र आव्हाड यांनीच विधानसभेत लक्ष्यवेधी मांडली होती. विशेष म्हणजे या निर्णयाला महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरणानेही (मॅट) विरोध केला होता. 

याबाबत काही उमेदवारांनी न्यायालयात धावही घेतली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानेही हा निर्णय नुकताच रद्द केला. या निर्णयाने आमचे समाधान झाले असून आम्हाला खऱ्या अर्थाने न्याय मिळेल अशा प्रतिक्रीया यावेळी आव्हाड यांच्या निवासस्थानी उपस्थित असलेल्या उमेदवारांनी व्यक्त केल्या आहेत.

ग्रामीण भागातील उमेदवारांना होणार फायदाnहा निर्णय समजताच रविवारी शेकडो उमेदवारांनी आव्हाड यांच्या ठाण्यातील निवासस्थानी जाऊन त्यांचे अभिनंदन केले. nसरकारने पोलिसांची पदे वाढवावी. त्यामुळे मेहनती मुलांना न्याय मिळेल.nतसेच थेट भरती न होता एमपीएससीच्या माध्यमातून उमेदवारांना आधार घेऊनच भरती होईल. nबेकायदेशीर थेट बढती द्यावी असा चुकीचा पायंडा पडला असता, आता खऱ्या अर्थाने याचा फायदा गावखेड्यातील उमेदवारांना मिळणार असल्याचे आव्हाड यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Policeपोलिस