शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

मुंब्य्रातील राष्ट्रवादीच्या नगरसेविकेचे सदस्यत्व रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2020 01:42 IST

मुंब्य्रातील राष्ट्रवादीच्या नगरसेविका हसिना अजीज (बाटा) यांचे जातप्रमाणपत्र रद्द झाल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द केल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

ठाणे : मुंब्य्रातील राष्ट्रवादीच्या नगरसेविका हसिना अजीज (बाटा) यांचे जातप्रमाणपत्र रद्द झाल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द केल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे ठाणे महापालिकेत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे संख्याबळ एकने कमी झाले आहे.महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत प्रभाग क्र मांक ३० हा इतर मागासवर्गीय महिलांकरिता राखीव होता. त्या जागेवर हसिना अजीज (बाटा) या राष्ट्रवादीच्या तिकिटावर भरघोस मतांनी विजयी झाल्या होत्या. त्यांच्या जातप्रमाणपत्राला प्रतिस्पर्धी उमेदवाराने हरकत घेऊन त्याबाबत दावा दाखल केला होता. न्यायालयाने नाशिक विभागातील जातपडताळणी विभागाला जातप्रमाणपत्राची सत्यता तपासण्याचे आदेश दिले होते. नाशिक जातपडताळणी विभागाने ४ जानेवारी रोजी त्यांचे जातप्रमाणपत्र रद्द केल्याचे ठामपाला कळवल्यानंतर आयुक्त संजीव जयस्वाल यांनी हसिना अजीज यांचे सदस्यत्व रद्द करून तसे २० जानेवारी रोजी त्यांना कळवले आहे.ठामपात राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची संख्या ३५ आहे. हसिना यांचे सदस्यत्व रद्द केल्याने त्यांची संख्या एकने कमी झाली आहे. मुंब्य्रातील आणखी एका राष्ट्रवादीच्या नगरसेविकेच्या जातप्रमाणपत्राचा खटला मुंबई उच्च न्यायालयात सुरू आहे. त्याबाबतही लवकरच निकाल अपेक्षित असल्याचे मुंब्य्रातील एका माजी नगरसेवकाने सांगितले.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसmumbraमुंब्रा