शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

माणकोलीचा पूल रद्द?, प्रकल्पग्रस्तांच्या मोबदल्याचा तिढा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 01:51 IST

मोठागाव ठाकुर्ली ते माणकोलीदरम्यानचा डोंबिवली आणि भिवंडीला जोडणा-या पुलाच्या प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न सोडवा, अन्थथा हा प्रकल्पच गुंडाळावा लागेल, असा इशारा एमएमआरडीएने महापालिकेला दिला आहे.

डोंबिवली : मोठागाव ठाकुर्ली ते माणकोलीदरम्यानचा डोंबिवली आणि भिवंडीला जोडणा-या पुलाच्या प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न सोडवा, अन्थथा हा प्रकल्पच गुंडाळावा लागेल, असा इशारा एमएमआरडीएने महापालिकेला दिला आहे.या प्रकल्पात बाधित झालेल्या डोंबिवलीतील ४५ भूमीपुत्रांना योग्य प्रमाणात मोबदला दिला गेलेला नाही. राज्य सरकारने त्याचे धोरण ठरवलेले नाही. तसेच डोंबिवली आणि भिवंडीच्या प्रकल्पग्रस्तांना भरपाई देताना वेगवेगळे निकष लावल्याचा मुद्दा पुढे आला. भिवंडीतील प्रकल्पग्रस्तांनी अजूनही जमीन दिलेली नाही, ही वस्तुस्थिती समोर येताच एमएमएमआरडीएच्या अधिकाºयांनी हा इशारा दिला.मोठागाव ठाकुर्ली ते माणकोली खाडीपुलाची २३० कोटींची निविदा २०१५ मध्ये काढण्यात आली. या पुलामुळे डोंबिवलीहून मुंबई-नाशिक महामार्ग लवकर गाठणे शक्य होईल. भिवंडी, ठाणे, नाशिक, मुंबईकडे जाण्यासाठी सोयीचा पर्याय उपलब्ध होईल. या पुलाच्या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गेल्यावर्षी झाला. पण कामाला मात्र संथगतीने सुरुवात झाली.डोंबिवलीच्या दिशेकडील पुलाच्या परिसरातील ४५ भूमीपुत्रांची जागा या प्रकल्पात बाधित झाली. हा पूल सीआरझेड क्षेत्रात येतो. तरीही ४५ भूमीपुत्रांनी आधी प्रकल्पासाठी जागा मोकळी करुन दिली. सीआरझेडच्या जागेचा मोबदला कशा स्वरुपात द्यायचा याचा धोरणात्मक निर्णय अजून राज्य सरकारने घेतलेला नाही. या पुलाचे काम एमएमआरडीए करते आहे. त्यासाठी कंत्राटदार नेमण्यात आला. डोंबिवलीच्या बाजूने कामाला सुरुवात झाली. पुलासाठी लागणारे सहा खांब उभारण्यात आले. डोंबिवलीतील भूमीपुत्रांना सीआरझेडमध्ये एक गुंठा जागेच्या बदल्यात एक गुंठा जागेचा टीडीआर दिला जाणार आहे. पण पुनर्वसन धोरणानुसार प्रत्यक्षात एक गुंठा जागेला दोन गुंठे टीडीआर द्यायला हवा.तरीही त्याची वाट न पाहता जागा देऊनही मोबदला देण्यात सरकारने आखडता हात घेतला. मोबदला देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या अखत्यारित असला तरी त्याची अंमलबजावणी पालिकेने करायची आहे.भिवंडीच्या दिशेने जवळपास ३५० पेक्षा जास्त भूमीपुत्र व शेतकºयांची जमीन बाधित होत आहे. भिवंडीच्या दिशेकडील बाधितांनी एक इंचही जागा एमएमआरडीएला प्रकल्पासाठी दिलेली नाही. त्यांच्याशी चर्चा सुरु आहे. त्यांच्या मागणीनुसार त्यांना दुप्पट मोबदला देण्याची तयारी सरकारी यंत्रणा दाखवत आहे. त्याचवेळी त्याच्या उलट कृती डोंबिवलीतील बाधितांबाबत केली जात असल्याने त्यांच्यात नाराजी आहे. त्यामुळे स्थानिक शिवसेना नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी त्यांना हक्क मिळवून देण्यात पुढाकार घेतला आहे.‘एक खिडकी’चा विचारप्रकल्प बाधितांसाठी एक खिडकी योजना सुरु करुन हा विषय महापालिका आयुक्त पी. वेलरासू यांनी मार्गी लावण्याची सूचना नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी महासभेत केली. त्यावर येत्या पंधरा दिवसांत डोंबिवलीतील प्रकल्पग्रस्तांच्या विषयावर तोडगा काढला जाईल आणि एक खिडकी योजना लागू करण्याचा विचार करू, असे आश्वासन आयुक्तांनी दिल्याची माहिती म्हात्रे यांनी दिली.महासभेपूर्वी पालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पाची बैठक पार पडली होती. तिला एमएमआरडीएचे आयुक्त यू. पी. एस. मदान आले होेते. त्यांच्याकडे मोठा गाव ठाकुर्ली-माणकोली पुलाचा मुद्दा चर्चेला आला. तेव्हा त्यांनी प्रकल्पासाठी जागा मोकळी करुन दिली नाही आणि प्रकल्पग्रस्तांचा तिढा सोडविला गेला नाही; तर नाईलाजास्तव हा प्रकल्पच गुंडाळावा लागेल, अशी तंबी दिली. जागा ताब्यात नसताना सरकारी यंत्रणा आणि महापालिकेने घाईगर्दीत हा प्रकल्प कशाच्या आधारे हाती घेतला, असा प्रश्न त्यांनी विचारला. जागा संपादनाच्या मुद्द्यावरुन प्रकल्पाची कोंडी केली जात असेल, तर सरकारी यंत्रणा व महापालिकेने त्याचा विचार करण्याची गरज आहे, असे मत त्यांनी माडले.

टॅग्स :mmrdaएमएमआरडीएthaneठाणे