शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

बाटलीबंद पाण्याची सक्ती करता येते का? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2024 06:39 IST

हॉटेलमध्ये बाटलीबंद पाणी विकत घेण्याची सक्ती केली तर?         

- मनीषा कोटेकर, ठाणे वाढदिवस असला, घरी पाहुणे आले किंवा मित्रांसोबत हॉटेलमध्ये जेवायला जाण्याचा योग येतो. अशा वेळी काही हॉटेलमध्ये बाटलीबंद पाणी आणून दिले जाते. नेहमीचे शुद्ध पाणी देण्याची विनंती केली तर आमच्याकडे ग्राहकांना चांगल्या आरोग्यासाठी हेच पाणी दिले जाते, तुम्हालाही हेच पाणी घ्यावे लागेल, असा सल्ला दिला जातो. बिलात पाण्याचे पैसे आकारले जातात; पण ग्राहकांना बाटलीबंद पाण्याची सक्ती करणे बेकायदेशीर आहे. जेवणाबरोबरच शुद्ध पाणी देणे ही हॉटेल व्यावसायिकांची जबाबदारी आहे.

भारतात एक कायदा आहे, जो १८०० च्या उत्तरार्धात तयार झाला होता. या कायद्यानुसार हॉटेलमध्ये कोणीही मोफत पाणी मागू शकते आणि तिथले स्वच्छतागृहदेखील वापरू शकतात. ब्रिटिश राजवटीत तयार करण्यात आलेल्या या कायद्यात म्हटले आहे की, हॉटेल आणि लॉजमध्ये तो तुमचा ग्राहक असो किंवा नसो, तिथे येणाऱ्या प्रत्येकाला स्वच्छतागृहांमध्ये प्रवेश द्यावा आणि ये-जा करणाऱ्यांना मोफत पाणी द्यावे. अनेक राज्ये आणि जिल्ह्यांनी सराय कायदा, १८६७ अंतर्गत हॉटेल्सची नोंदणी अनिवार्य केली आहे. पाणी पिण्याचा आणि हॉटेलमध्ये स्वच्छतागृह मोफत वापरण्याचा अधिकार सर्वांना आहे.

बाटलीबंद पाणी घेतल्याने हॉटेलचालकांचा चांगला धंदा होतो. त्यामुळे वेटरने बाटलीबंद पाणी घेण्याची सक्ती केली तर मालकाकडे तक्रार करता येते. त्यातूनही काहीच फरक नाही पडला तर पोलिस किंवा ग्राहक न्यायालयात दाद मागता येते.  

याबाबत ॲड. विकास बर्गे म्हणाले, हॉटेलमध्ये आल्यावर ग्राहकांना शुद्ध पाणी उपलब्ध करून देणे हे हॉटेल व्यावसायिकांचे कर्तव्य आहे. त्यांनी ग्राहकांना बाटलीबंद पाणी विकत घेण्याची जबरदस्ती केली तर ग्राहकांना ते स्पष्ट शब्दांत नाकारण्याचा अधिकार आहे. तरीही  खरेदी करण्यासाठी जबरदस्ती किंवा अट ठेवली तर ग्राहक न्यायालयात  कलम ४२ (२) व कलम ४७ अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसखाली तक्रार करता येईल; परंतु त्याबद्दलचा पुरावा असणे आवश्यक आहे. जेणेकरून कारवाई करणे सोपे होऊ शकेल.

टॅग्स :thaneठाणेWaterपाणी