शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

वॉररूमद्वारे प्रचार पोहोचला शिगेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 01:16 IST

प्रचाराचे काम दिवसरात्र सुरू : मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न

ठाणे : निवडणूक प्रचाराचा वेग आता वाढला आहे. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांना केवळ चारच दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांच्या वॉररूम जोमाने कामाला लागल्या आहेत. मतदारांची यादी तयार करण्यापासून त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर आपल्या हक्काच्या उमेदवाराला मत देण्यासाठी जागरूक करण्याचे काम दिवसरात्र या वॉररूमच्या माध्यमातून सुरू झाले आहे. ठाणे शहरातील चार मतदारसंघांसह जिल्ह्यातील १८ मतदारसंघांत थोड्याफार फरकाने सर्वपक्षीय उमेदवारांच्या वॉररूम याच धर्तीवर कार्यरत आहेत.

ठाणे शहरातील चार विधानसभा मतदारसंघांत ४१ उमेदवार नशीब आजमावत आहेत. त्यानुसार, चार मतदारसंघांसह जिल्ह्यातील १८ मतदारसंघांत उमेदवारांचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आहे. मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांची तारेवरची कसरत सुरू आहे. प्रचारफेऱ्या, रॅली, डोअर टू डोअर प्रचार, बाइक रॅली असा धडाका सध्या सुरू आहे. मात्र, तरीही मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी बहुसंख्य उमेदवारांनी आपली वॉररूमही सज्ज ठेवली आहे. या वॉरमधून एखाद्या विरोधकाने सोशल मीडियावरून आरोप केले असतील, त्याला त्याच पद्धतीने प्रत्युत्तर देण्याचे काम सुरूआहे. उमेदवाराच्या प्रगतीपुस्तकापासून ते भविष्यात काय करणार, याचा ऊहापोहसुद्धा इथे केला जात आहे.

असा होत आहे प्रचारव्होटर स्लिप निवडणूक विभागाकडून पोहोचविण्यापूर्वीच उमेदवारांकडून मतदारांना पोहोचवल्या जात आहेत. मतदारांचे व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक मिळवून त्यावर मतदानासाठी आवाहन केले जात आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर एखादा मतदार नसेल तर त्याला टेक्स मेसेज पाठविले जात आहेत. आपल्या उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहनदेखील केले जात आहे. तसेच आपल्या उमेदवारासाठी तयार केलेले गाणे, त्याची मुलाखत, रॅली, चौकसभा यांचेही अपडेट या वॉररूमच्या माध्यमातून चुटकीसरशी उपलब्ध करून दिले जात आहेत. बहुतेक उमेदवारांच्या वॉररूममध्ये दिवसरात्र काम करणारी १० ते १५ तरुणांची फळी सज्ज आहे. त्यांच्या मदतीला इंटरनेट आणि सात ते आठ संगणक, लॅपटॉप असे सर्व साहित्य त्यांना उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.

टॅग्स :thane-acठाणे शहरkalyan-east-acकल्याण पूर्व