शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
2
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
4
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
5
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
6
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
7
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
8
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
9
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
10
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
11
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
12
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
13
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
14
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
15
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
16
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
17
‘निवडणूकपूर्व’साठी राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार) अनुत्सुक; निवडणुकीनंतर युती करण्याला मात्र पसंती
18
४८ हजार जणांनी म्हटले, दुबार मतदान करणार नाही
19
‘अमेरिकन ड्रीम’ला H-1B व्हिसाचे नख लागते, तेव्हा...
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णालयांच्या लुटमारीविरूद्ध मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 00:53 IST

मीरा-भार्इंदरमध्ये नागरिकांचे स्वाक्षरी अभियान : माणुसकी दाखवण्याचे आवाहन

मीरा रोड : मीरा भार्इंदर महापालिका व लोकप्रतिनिधींकडून एकीकडे महापालिका रुग्णालयात अत्यावश्यक वैद्यकिय सुविधाच पुरवल्या जात नाहीत. दुसरीकडे शहरातील काही खाजगी रुग्णालयांकडून रुग्ण आणि नातलगांच्या अडचणीचा गैरफायदा घेऊन मनमानी लूट केली जात असल्याचा आरोप करत नागरीकांनी त्याविरोधात निदर्शने करून, सह्यांची मोहिम चालवली आहे.भार्इंदर पुर्वेला रेल्वे स्थानक व परिसरात नागरिकांच्या वतीने काही खाजगी रुग्णालयांनी चालवलेल्या लुटमारीविरोधात निदर्शने करण्यात आली. देशाचा कायदा रुग्णालयांकडून होणारी लूट व बेईमानांच्या आतंकापासून नागरिकांची सुटका कधी करणार, असा सवाल करणारे फलक नागरिकांनी हाती घेतले होते. त्याचबरोबर माणुसकी दाखवा असे आवाहनदेखील खाजगी रुग्णालयांना यावेळी करण्यात आले. यावेळी पत्रकं वाटून त्यावर नागरिकांच्या सह्या घेण्यात आल्या.

पत्रकामध्ये काही खाजगी रुग्णालयांकडून बेईमानी कशी केली जाते, हे नमुद केले आहे. त्यात कारण नसताना वयोवृध्दांना आयसीयूमध्ये ठेवले जाते. गरज नसताना गरोदर महिलेची शस्त्रक्रियेद्वारे प्रसुती केली जाते. अनावश्यक तपासण्या करायला लावल्या जातात. गरज नसताना रुग्णास रुग्णालयात ठेवले जाते. भरमसाठ औषधं दिली जातात आणि तीही रुग्णालयातील औषधाच्या दुकानातूनच घ्यावी लागतात.उपचार आणि देखभालीत हलगर्जीपणा केला जातो. परंतु देयक मात्र वाट्टेल तसे आकारले जाते. रुग्णालयांना शासन, न्यायालय आदी कोणाचाही धाक राहिलेला नसून, त्यांच्यासाठी कायदासुध्दा कठोर नाही. रुग्ण वा नातलगांची तक्रार घेऊन अशा रुग्णालयांविरोधात गुन्हा दाखल केला जावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.माझ्या पत्नीचा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बळी गेला. तिला एकापाठोपाठ एक तीन रूग्णालयांमध्ये दाखल केले होते. तीनही रुग्णालयांचे १७ लाख रूपये बील झाले. लोकांकडून उसने घेऊन, कर्ज काढून रुग्णालयास पैसे भरले. या रुग्णालयांविरोधात मेडिकल काऊन्सिलकडे तक्रारी केल्या. आता ठाणे न्यायालयात फौजदारी गुन्ह्यासाठी दावा दाखल केला आहे. माझ्यासारख्या अनेकांना उध्वस्त करण्याचे काम काही खाजगी रुग्णालयांकडून सुरु आहे. आतंकवाद्यांपेक्षा जास्त हे डॉक्टर व त्यांची रुग्णालयं घातक आहेत. त्यातूनच नागरीकांनी ही मोहिम सुरु केली आहे. - लालजी भानुशाली, ज्येष्ठ नागरिकभानुशालीसारख्या अनेकांना काही खाजगी रुग्णालयांकडून शोषण करण्याचा रोज अनुभव येत असतो. कमी वेळात काही डॉक्टर व त्यांची रुग्णालये झपाट्याने वाढली आणि आलिशान झाली आहेत. त्यांच्याकडे एवढा पैसा आला कुठुन? याविरोधात आंदोलन आणखी तिव्र करु.- प्रदीप जंगम, सामाजिक कार्यकर्ता 

टॅग्स :mira roadमीरा रोडthaneठाणेhospitalहॉस्पिटल