शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मद्यपींसह सुसाट वाहनचालकांवर ठाणे पोलिसांच्या स्पीडगनसह कॅमे-याची नजर राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 23:16 IST

भरघाव येणारी वाहने तसेच विनाहेल्मेट दुचाकी चालविणाऱ्यांवर आता ठाणे पोलिसांच्या इंटरसेक्टर व्हेइकल स्पीड गन विथ कॅमेरा या आधुनिक तंत्रज्ञानाने विकसित केलेल्या वाहनांमधून करडी नजर राहणार आहे. अशा दोन वाहनांचा ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या ताफ्यात ४ नोव्हेंबर रोजी समावेश करण्यात आला.

ठळक मुद्दे सहपोलीस आयुक्तांनी दाखविला हिरवा झेंडातीन किलोमीटरवरूनच काढणार वाहनाच्या वेगाचा फोटोठाणे पोलिसांच्या ताफ्यात दोन अत्याधुनिक वाहनांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत ठाणे शहर वाहतूक पोलिसांच्या ताफ्यात स्पीडगन कॅमे-यासह दोन अत्याधुनिक वाहनांचा समावेश करण्यात आला आहे. या वाहनांना ठाण्याचे सहपोलीस आयुक्त सुरेश मेकला यांनी हिरवा झेंडा दाखवून ती ठाणेपोलिसांच्या सेवेत सोमवारी दाखल केली.राज्यभरातील पोलिसांसाठी दिल्लीतील एका खासगी कंपनीने तंत्रज्ञान विकसित केलेली ९६ वाहने गृहविभागाने दिली आहेत. त्यातील इंटरसेक्टर व्हेइकल स्पीड गन विथ कॅमेरा अशी आधुनिक तंत्रज्ञानाने विकसित केलेली दोन वाहने ही ठाणे शहर पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण शाखेला देण्यात आली आहे. या वाहनांच्या इंजीनची मेकला तसेच पोलीस उपायुक्त अमित काळे यांच्या हस्ते ४ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता विधिवत पूजा केल्यानंतर त्यांना हिरवा झेंडा दाखविण्यात आला.* या प्रकारांना बसेल आळाभारतीय बनावटीच्या सॉफ्टवेअरचे तंत्रज्ञान या वाहनांमध्ये असून त्याद्वारे विनाहेल्मेट जाणारे दुचाकीस्वार, कारमधून सीट बेल्ट न लावणारे चालक, महामार्गावर भरधाव वेगाने जाणारे वाहनचालक या सर्वांवर या वाहनांद्वारे ठाणे पोलिसांची यापुढे करडी नजर राहणार आहे. याशिवाय, वाहनाला फॅन्सी नंबरप्लेट लावणारे, वाहनांना काळी फिल्म लावणारे, वाहन चालविताना मोबाइलवर बोलणाºयांना पोलिसांचा हा कॅमेरा अचूक टिपणार आहे. शिवाय, कोणताही वाद न घालता वाहनावरील क्रमांकाच्या आधारे स्वयंचलित यंत्रणेद्वारे ई-चलनाच्या दंडाची पावतीही संबंधित वाहनचालकाच्या मोबाइलवर पाठविली जाणार आहे. याच वाहनांमध्ये ब्रिथ अ‍ॅनालायझरची यंत्रणाही बसविण्यात आली असून एखाद्या मद्यपी वाहनचालकाला थांबवून फोटोसह त्याने किती प्रमाणात मद्यप्राशन केले, याचा अहवालही तत्काळ या यंत्रणेद्वारे मिळणार आहे. यापूर्वीच्या ब्रिथ अ‍ॅनालायझरमध्ये फोटो काढण्याची सुविधा नव्हती. आता मात्र फोटोसह मद्यपीचा अहवाल मिळणार आहे. त्यामुळे तळीरामांनाही चांगलाच चाप बसणार आहे. या अत्याधुनिक वाहनांचा वाहतूक शाखेत समावेश झाल्याने वाहतूक नियमांचे पालन न करणाºया वाहनचालकांवर कारवाई करणे त्यांना पुराव्यासह ओळखणेही सुलभ होणार असून वाहतूक नियमबद्ध, सुरळीत आणि सुरक्षित होण्यास मदत होणार असल्याचे मेकला यावेळी म्हणाले.

‘‘या वाहनांमधील स्वयंचलित स्पीड गनमुळे तीन किलोमीटर अंतरावरील वाहनांचाही अचूक वेग मोजता येणार आहे. शिवाय, एकाच कॅमे-यातून दुचाकी, चारचाकी आणि अवजड वाहनांवरील वेगवेगळ्या वेगाची स्पीड गनकडून माहिती टिपली जाणार आहे. महामार्गावर दुचाकीला प्रतितास ४० किमी, कारसाठी ८० तर अवजड वाहनांना ६० किमीची वेगमर्यादा असेल, तर संबंधित वाहनांच्या वेगाप्रमाणेच या स्पीड गनकडून तशी दंडात्मक कारवाई ई-चलनाद्वारे केली जाणार आहे. ठाणे पोलिसांना या वाहनांचा चांगल्या प्रकारे उपयोग होणार आहे.’’सुरेश मेकला, सहपोलीस आयुक्त, ठाणे शहर.....................

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसtraffic policeवाहतूक पोलीस