शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

परराज्यातील नामचिन गुंड होणार कॅमेराकैद; १२०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2019 06:11 IST

१५ ऑगस्टला इंटिग्रेटेड डाटा सेंटर व कंट्रोल रूमचे उद्घाटन

ठाणे : चोरांवर वॉच ठेवण्यासाठी, गुन्हेगारी कृत्यांना आळा घालण्यासाठी आणि पोलिसांना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मदत व्हावी तसेच वाहतुकीचे व्यवस्थापन व नियंत्रण करणे सोपे जावे, महिलांची छेडछाड रोखण्यासाठी शहराच्या विविध भागांत ठाणे महापालिकेच्या माध्यमातून सीसीटीव्हीचे जाळे पसरले जात आहे. आतापर्यंत शहरात १२०० कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांसाठी इंटिग्रेटेड डाटा सेंटर व कमांड आणि कंट्रोल रूम सुविधा सज्ज होत असून त्याचे उद्घाटन येत्या १५ आॅगस्ट रोजी होणार आहे. या यंत्रणेमुळे एखादा वेश बदलून आलेला आरोपीसुद्धा या कॅमेºयांना फसवू शकणार नसल्याचा दावा पालिकेने केला आहे.

मागील काही महिन्यांपासून शहराच्या विविध भागांत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यास सुरुवात झाली. गुन्ह्यांची उकल जलदगतीने होण्यासाठी तसेच सुनसान परिसर, सर्व्हिस रोड आणि हायवेवर बसवण्यात आलेल्या कॅमेºयांची गुन्हेगारांवर नजर ठेवण्यास तसेच वाहतूक नियंत्रित करण्याकरिता चांगली मदत होत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. नगरसेवक निधीच्या माध्यमातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. ठाणे स्टेशन या अत्यंत गजबजलेल्या ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून ३९ कॅमेरे बसवण्यात आले आहेत. शहराच्या विविध भागांत तब्बल १२०० कॅमेरे बसवण्यात आले असून येत्या काळात आणखी ४०० कॅमेरे बसवले जाणार आहेत. सुरुवातीला २ मेगापिक्सलचे कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे कॅमेरे बसवण्यात आले असून ते चार मेगापिक्सलचे असल्याचे पालिकेने सांगितले.

या सीसीटीव्ही कॅमेºयांचे कमांड अ‍ॅण्ड कंट्रोल सेंटर हे हाजुरी येथे प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आले असून ते येत्या १५ आॅगस्ट रोजी पूर्णपणे कार्यरत होणार आहे. स्मार्ट सिटी योजनेच्या माध्यमातून हाजुरी येथे उभारण्यात येत असलेल्या नियंत्रण कक्षासोबत डाटा सेंटरचीही निर्मिती करण्याचे काम सुरू आहे. तीन टियर श्रेणीच्या या कक्षाचे काम अंतिम टप्प्यात आहे.

नागरी सुविधाही जोडल्या जाणार

  • महापालिकेमार्फत ज्या काही सुविधा ठाणेकरांसाठी पुरवल्या जात आहेत, त्या सुविधांचे आधुनिकीकरण करून त्या सुविधा सध्या या यंत्रणेशी जोडल्या जाणार आहेत. त्यानुसार, पहिल्या टप्प्यात ५० पैकी २० नागरी सुविधा या कमांड कंट्रोल रूमशी जोडल्या जाणार आहेत.
  • त्यात शहरसुरक्षा व्यवस्थापन, पाणीपुरवठा व्यवस्थापन, कचरासंकलन, सांडपाणी, वाहतूक नियंत्रण, पथदिव्यांचे व्यवस्थापन अशा सुविधांचा समावेश आहे. या सुविधांमध्ये बिघाड झाल्यास नियंत्रण कक्षाला त्याची माहिती उपलब्ध होणार असून लागलीच या सुविधा पूर्ववत करण्यास मदत होणार आहे.
  • अतिवृष्टी, आग लागणे, इमारत कोसळणे यासंबंधीची माहिती नियंत्रण कक्षाला कॅमेºयांच्या मदतीने तत्काळ कळणार असून यामुळे त्याठिकाणी मदतीसाठी यंत्रणा पाठवणे शक्य होणार आहे.

यंत्रणेचा असा होणार फायदाया यंत्रणेमुळे परराज्यातून किंवा अन्य कोणत्याही भागातून गुन्हे करून पसार झालेल्या गुन्हेगाराच्या छायाचित्रांची नोंद पोलिसांच्या मदतीने केली जाणार आहे. या नोंदीमुळे संबंधित गुन्हेगाराने शहरात प्रवेश केला, तर कॅमेºयाद्वारे नियंत्रण कक्षाला त्याची तत्काळ सूचना मिळणार आहे. गुन्हेगाराने केस, दाढी वाढवलेली असेल किंवा अन्य काही वेशभूषा केली असेल, तरीही नियंत्रण कक्षातील यंत्रणा कॅमेºयातील छायाचित्रांचे विश्लेषण करून त्या गुन्हेगाराला ओळखू शकणार आहे.पोलीस कमांड कंट्रोल रूमचे आधुनिकीकरणहाजुरी येथील कमांड कंट्रोल रूम सुरू झाल्यावर पालिका पोलिसांच्या कमांड कंट्रोल रूमचेही आधुनिकीकरण करणार असून त्यामुळे पालिका आणि पोलिसांचे एकाच वेळेस शहरात घडणाºया प्रत्येक बारीकसारीक हालचालींवर लक्ष राहणार आहे.

 

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसcctvसीसीटीव्ही