पंकज रोडेकर / ठाणेमीरारोड येथून अमेरिकन नागरिकांना धमकावून त्यांच्याकडून पैसे उकळणाऱ्या बहुचर्चित कॉल सेंटर घोटाळा आता रूपेरी पडद्यावर (चित्रपट) कथेच्या स्वरुपात झळकण्याची शक्यता आहे. याबाबत तामिळनाडू चित्रपटसृष्टीतील अर्थात टॉलीवूडमधील एका दिग्दर्शकांच्या काही मंडळींनी ठाणे पोलिसांची भेट घेतली आहे. याबाबत अद्यापही सविस्तर चर्चा झालेली. मात्र, काही जण येऊन गेल्याबाबत ठाणे शहर पोलीस आयुक्त परमबीर सिंंह यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दुजोरा दिला आहे.कॉल सेंटर घोटाळा उघडकीस आणण्यात ठाणे शहर पोलिसांना मोठे यश आले आहे. याचा तपास करताना, यामध्ये आरोपींची नावांमध्ये पहिल्यांदा गमंतीदार नाव आले ते म्हणजे ‘कटप्पा ’. त्यानंतर यामध्ये फरार मुख्य आरोपी शॅगी उर्फ सागर ठक्कर याने आपल्या गर्लफ्रेण्डला खरेदी करून दिलेली भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली यांची आॅडी कार, तसेच मॅजीज जॅकचा वापर झाल्याचे समोर आल्यावर गुगल कंपनीकडे पोलिसांनी मागितलेली मदत आणि त्याला त्यांच्याकडून मिळालेला प्रतिसाद. याचदरम्यान तपास सुरू असताना, नवनवीन गोष्टींचा उलगडा होत असताना पोलिसांना चक्रावरून सोडणारी आणखी एक गोष्टी समोर आली, ती म्हणेज इंटरनेटच्या माध्यमातून बीट कॉईनद्वारे खरेदी व्यवहार. त्याचबरोबर पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटांना भारतीय चलन व्यवस्थेतून झालेली बंदी. यामुळे तपासकामी बाहेर असलेल्या ठाणे पोलिसांची उडलेली पंचाईत. यासह कॉलसेंटरची खरी सुरुवात करणारा शॅगीचा गुरु जगदीश याच्यापेक्षा शॅगीने घेतलेली गगन भरारी अशा अनेक गोष्टी एखाद्या मसाला चित्रपटासाठी पोषक ठरणार आहेत. म्हणून बहुद्या हा विषय चित्रपटासाठी रंजक ठरण्याची शक्यता लक्षात घेऊनच सोमवारी ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात तामिळनाडू फिल्मसीटीतील काही जणांनी ठाणे पोलिसांची भेट घेतली. मात्र, त्यांनी येताना, पोलीस अधिकाऱ्यांची वेळ घेतली नसल्याने तसेच त्यातच ठाणे शहर पोलीस इफेड्रीन, कॉल सेंटर प्रकरण, लष्कर भरती घोटाळा या सारख्या केसेसमध्ये गुंतलेले असताना, अवघ्या काही मिनिटांची चर्चा झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
कॉल सेंटर घोटाळ्यावर चित्रपट?
By admin | Updated: March 22, 2017 01:33 IST