शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

घरगुती गॅस गळती कळताच १९०६ क्रमांकावर त्वरित फोन करा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2017 22:25 IST

स्वत:च्या घरात किंवा शेजा-यांच्या घरातील गॅस सिलिंडरमधून गळती होत असल्याचे कळताच घाबरून जावू नका. त्वरीत १९०६ या टोलफ्री क्रमांकावर दूरध्वनी करून संभाव्य आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 ठाणे- स्वत:च्या घरात किंवा शेजा-यांच्या घरातील गॅस सिलिंडरमधून गळती होत असल्याचे कळताच घाबरून जावू नका. त्वरीत १९०६ या टोलफ्री क्रमांकावर दूरध्वनी करून संभाव्य आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.घरगुती गॅस सिलिंडरमधून होणा-या गॅस गळतीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ शकते. मग ती आपल्या घरातली गळती असेल, नाहीतर शेजारच्या घरातली. अशा वेळी तातडीने संपर्क साधण्यासाठी केंद्र सरकारने देशपातळीवर १९०६ हा एक हेल्पलाइन क्र मांक सुरू केला. देशाच्या कोणत्याही भागातून कोणत्याही वेळी या हेल्पलाइनवर संपर्क साधता येतो व तातडीने मदत मिळवता येते. दिवस रात्र ही सेवा सुरु आहे. हिंदी, इंग्रजी व्यतिरिक्त मराठी, गुजराती आदी ९ स्थानिक भाषांमधून ही सेवा मिळत आहे.या कॉल सेंटरचे वैशिष्ट्य म्हणजे याचे काम वेब बेस्ड एप्लिकेशनद्वारे चालते. याद्वारे कॉल सेंटर कर्मचारी तुमचे लोकेशन तसेच जवळच्या गॅस वितरकाचे, मेकॅनिकचे लोकेशन शोधून थेट त्याला संदेश पोहचवतात. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तुमच्या गॅस गळतीचा संदेश वितरक, मेकॅनिक यांनी काही कारणामुळे स्वीकारला नाही किंवा दूरध्वनी, मोबाईल कॉल्स उचलले नाहीत तर संबंधित कॉल थेट त्या भागातल्या पेट्रोलीयम कंपनीच्या अधिकाºयापर्यंत आणि प्रसंगी त्याही पुढच्या वरिष्ठ अधिकाºयापर्यंत थेट जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. रात्रं दिवस ही सेवा सुरू आहे.गॅस गळतीची माहिती कळताच संबंधित यंत्रणा सक्रीय होऊन तुमच्या मोबाईल किंवा दूरध्वनीवरील कॉलच्या आधारे तुमचे लोकेशन शोधूत तुमच्याा घरापर्यंत सहज पोहचत असून त्यांच्याव्दारे तात्काळ कार्यवाही करण्यात येते. यासाठी या कॉल सेंटर पोर्टलवर सातत्याने वितरक, मेकॅनिक्स, पोलीस, त्या - त्या भागातले अग्निशमन दल यांची माहिती अद्ययावत केली जात असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

टॅग्स :thaneठाणे