शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

ईडीच्या चौकशीच्या भीतीनेच ठाण्यातील सीएने केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2020 06:05 IST

भाडेकरूसोबत झाला होता करार, वारस नोंदणीसाठीही केली होती चौकशी

जितेंद्र कालेकर 

ठाणे : अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि मुंबई आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू असलेला चौकशीचा ससेमिरा तसेच अटकेच्या भीतीनेच मुंबईतील तब्बल चार हजार कोटींचा घोटाळा असलेल्या ‘कॉक्स अ‍ॅण्ड किंग्ज लिमिटेड ट्रनर मॉडीसन’ या आंतरराष्ट्रीय टूर्स कंपनीचा लेखापाल (सीए) सागर सुहास देशपांडे (३८, रा. चरई, ठाणे) याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे टिटवाळा येथील घरासाठी वारस नोंदणी करण्यासाठीही त्याने दोन आठवड्यांपूर्वीच चौकशी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हजारो कोटींच्या गैरव्यवहारामुळे या कंपनीच्या काही संचालकांना अटक झाली आहे. यासंबंधी कंपनीवर तीन वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. त्यातच कंपनीचा सीए सागरचीही याच प्रकरणातील तपासासाठी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी केली होती. पुन्हा १३ ऑक्टोबर रोजीही त्याला पाचारण केले होते. तत्पूर्वीच ११ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास टिटवाळा येथे जाऊन येतो, असे वडील सुहास देशपांडे यांना सांगून तो ठाण्यातील घरातून बाहेर पडला होता. मात्र, १२ ऑक्टोबर रोजी त्याने कल्याण परिसरात रेल्वेखाली आत्महत्या केली. तब्बल पाच दिवसांनी म्हणजे १७ ऑक्टोबर रोजी कुटुंबीयांना त्याच्या मृत्यूची माहिती पोलिसांकडून समजली. 

दरम्यान, ईडीकडून अटक होऊ शकते, या भीतीने सागरला ग्रासले होते. तसे त्याने काही मित्रांकडे बोलून दाखविले होते. यातूनच त्याने आत्महत्येचा विचार पक्का केला. पण, त्याआधी टिटवाळ्यातील घराच्या भाडेकराराचे नूतनीकरण करणे आणि त्या घरासाठी वारस नोंद करण्यासाठीही त्याने विचारपूस केली. टिटवाळा येथील भाडेकरूचा करार संपण्याला दीड महिन्याचा अवधी बाकी होता. मात्र, ऑडिट सुरू होईल, त्यासाठी लवकर अ‍ॅग्रिमेंट बनवायचे असल्याचे सांगून त्याने भाडेकरूकडून भाडेकरार ९ ऑक्टोबरला पूर्ण केला. त्या वेळीच त्याने घराला वारस नोंदणी करण्यासाठी काय करावे लागेल, अशी विचारणा त्याच्या भाडेकरूकडे केली होती. घटस्फोटित असलेला सागर वारस म्हणून कोणाची नोंद करणार होता, हे मात्र स्पष्ट झाले नाही.दोन आठवड्यांपूर्वीच केला आत्महत्येचा निश्चय -घराला वारस नोंदणी करण्यासाठी काय करावे लागेल, अशी विचारणा सागरने त्याच्या भाडेकरूकडे केली होती. सोसायटीच्या सेक्रेटरीकडे अन्यथा बिल्डरकडून तशी नोंदणी करावी लागेल, असा सल्लाही या भाडेकरूने दिला होता. यावरून दोन आठवड्यांपूर्वीच सागरने आत्महत्येचा निश्चय केला होता, हे स्पष्ट होत असल्याची बाब पोलीस तपासात समोर आली आहे. 

टॅग्स :Suicideआत्महत्याchartered accountantसीएthaneठाणेEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय