शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पालेभाज्या विकत घेताय की आजार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 23:48 IST

लोकलमधून प्रवास करताना बाहेर पाहिले की हिरव्यागार पालेभाज्यांची पिकं दिसतात. बघूनच खाव्याशा वाटणाऱ्या या पालेभाज्या पिकवण्यासाठी गटारातील घाण पाण्याचा वापर केला जातो.

लोकलमधून प्रवास करताना बाहेर पाहिले की हिरव्यागार पालेभाज्यांची पिकं दिसतात. बघूनच खाव्याशा वाटणाऱ्या या पालेभाज्या पिकवण्यासाठी गटारातील घाण पाण्याचा वापर केला जातो. यामुळे गंभीर आजार होत असल्याचे अनेकदा उघडकीस आले आहे. ठाण्यासह मीरा-भार्इंदर महानगरपालिकेने अशा भाजीपाला उत्पादकांवर अलीकडेच कारवाईदेखील केली. तरीही हे प्रकार थांबण्याचे नाव घेत नाही. या पार्श्वभूमीवर ठाणे तसेच अन्य शहरांतील परिस्थितीचा आढावा घेतला आहे ‘लोकमत’चे प्रतिनिधी पंकज रोडेकर, अनिकेत घमंडी, धीरज परब, पंकज पाटील, सदानंद नाईक यांनी.

दृढ आरोग्यासाठी हिरव्या पालेभाज्यांचे जास्तीत जास्त सेवन करण्याचा प्रयत्न बरेचजण आवर्जून करतात. मात्र या पालेभाज्यांचे उत्पादन घेण्याची अस्वच्छ प्रक्रिया पाहिली की कुणाच्याही अंगावर काटा आल्यावाचून राहणार नाही. ठाण्यात अनेक ठिकाणी, विशेषत: रेल्वेमार्गाजवळ असलेल्या जागांवर चक्क गटाराचे पाणी वापरुन पालेभाज्यांचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे भाजीबाजारातून आपण पालेभाज्या विकत घेतोय की कॅन्सरसारखे गंभीर आजार, हा प्रश्नच आहे.

रेल्वेमार्गाजवळच्या जागांवर अतिक्रमण होऊ नये म्हणून रेल्वे प्रशासन त्या भाड्याने देते. जागा सुरक्षित राहावी यासाठी ती भाजीपाला उत्पादकांना भाड्याने दिली जाते. यातून रेल्वेला उत्पन्नही मिळते. यामुळे एक एकर जागा रेल्वेने भाड्याने दिल्या आहेत. मात्र भाजीपाला पिकविण्यासाठी विहीर नसल्याने येथे शेती करणारे गटाराच्या पाण्याचा सर्रास वापर करतात. पण या शेतकऱ्यांवर कारवाई होताना दिसत नाही. मध्यंतरी, ठाणे महापालिकेने अशाप्रकारे भाजीपाल्यांच्या मळ्यांवर कारवाई केली. मात्र त्यानंतरही या परिस्थितीत सुधारणा झाली नसून, ठाणेकरांच्या आरोग्याशी खेळण्याचे प्रकार बिनदिक्कत सुरुच आहेत.

हजारो रूपयात मिळते जागा भाड्यानेरेल्वेमार्गाजवळील जागा भाड्याने देताना, ती प्रामुख्याने रेल्वेच्या कर्मचाºयांना दिली जाते. मग, ती मंडळी त्यांच्या खात्रीतील व्यक्तींना देतात. या जागांवर कुणीही दावा करणार नाही ही यामागची संकल्पना आहे. एक एकर जागा ही रेल्वेच्या कर्मचाºयाला ८ हजाराला मिळते. त्यानंतर तो कर्मचारी ती जागा दुसºयाला १३ हजाराने भाड्याने देतो.भाज्या जातात प्रमुख मंडईतया मळ्यात प्रामुख्याने मुळा, पालक, चवळी आदी पाल्याभाज्यांचे पिक घेतले जाते. ही पिके घेण्याची कारणे प्रामुख्याने कुणीही चोरी करत नाही. या पिकांसाठी यापूर्वी खत म्हणून कापूस वापरला जात होता. मात्र, कापूस मिळत नसल्याने सेंद्रिय खत वापरणे सुरू केले आहे. येथील भाज्या प्रामुख्याने ठाणे, मुलुंड, दादर तसेच वाशीच्या मंडईत जातात.

विहीर नसल्याने वापरले जाते गटाराचे पाणीजागा लहान असल्याने तेथे विहीर नसते. त्यामुळे परिसरातून जाणाºया गटराच्या पाण्याचा वापर पिकांसाठी केला जातो. मात्र, ठाणे महापालिकेने केलेल्या कारवाईनंतर रेल्वे प्रशासनाने भाजीपाल्यासाठी विहिरीतील पाण्याचा वापर करा असे म्हटले आहे. त्यामुळे विहीर खेदण्याचे काम ठाण्यात तरी बºयाच ठिकाणी सुरू झाले आहे. या ठिकाणी प्रामुख्याने उत्तर प्रदेश, बिहार येथील नागरिक दिसतात.

पालिकेने केली कारवाईपारसिकनगर, खारीगाव परिसरातील आतकोनेश्वर, मफतलाल कम्पाउंड येथे सांडपाण्यावर पिकवत असलेल्या भाज्यांच्या मळ्यांवर पालिकेने मध्यंतरी कारवाई केली. येथील माती व पाण्याचे नमुनेसांडपाण्यासह रसायनमिश्रित पाण्याचा वापर करून भाजीचे मळे फुलवले जातात. ही बाब अतिधोकादायक आहे. जसे गांजाच्या शेतीवर बंदी घातली आहे, तशी बंदी या भाज्यांच्या मळ्यांवर घालावी. या भाज्या खाल्ल्याने पोटाच्या आजारांचा प्रादुर्भाव प्रामुख्याने होतो. जंतूमुळे डोक्यात गाठही तयार होते. ही बाब अत्यंत धोकादायक असून अशा भाज्या पिकवण्यापासून विक्रीवरही बंदी घालावी.- डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक,

ठाणे प्रदूषण विभागाने घेवून ते सदोष आढळल्यानंतर जेसीबीच्या मदतीने संपूर्ण मळे उखडून टाकण्याची कारवाई केली. समतानगर येथील अशाच मळ्यांवरही कारवाई केली आहे.