शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

CoronaVirus News : व्यावसायिकांनी बदलले व्यवसाय, पाणीपुरीवाला विकतोय कांदे-बटाटे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 12:23 AM

आर्थिक तोटा भरून काढण्यासाठी काही व्यावसायिक आपला मूळ व्यवसाय बदलून व्यवसाय करत असल्याचे दृश्य बाजारपेठांमध्ये दिसत आहे.

कुमार बडदे मुंब्रा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे व्यावसायिक पार मेटाकुटीस आले होते. आता अनलॉक-१ मध्ये काही निर्बंध शिथिल झाले असले, तरी राज्य सरकारने अद्याप काही व्यावसायिकांना व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिलेली नाही. त्यामुळे आर्थिक तोटा भरून काढण्यासाठी काही व्यावसायिक आपला मूळ व्यवसाय बदलून व्यवसाय करत असल्याचे दृश्य बाजारपेठांमध्ये दिसत आहे.अनलॉक-१ मुळे हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे. परंतु, अनलॉकमध्ये अद्यापही हॉटेल व्यावसायिकांना पूर्णपणे हॉटेल उघडण्याची तसेच पाणीपुरीसारख्या खाद्यपदार्थ विकणाऱ्या व्यावसायिकांना त्यांचे व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारने परवानगी दिलेली नाही. त्यामुळे हे व्यावसायिक व्यवसायाचे स्वरूप बदलून व्यवसाय करत आहेत.लॉकडाऊनच्या आधी पाणीपुरी, शेवपुरी, भेळ विकणारे विक्रेते सध्या कांदे, बटाटे विकत आहेत. तर, काही हॉटेल व्यावसायिक गहू, तांदूळ, डाळी आदी किराणा सामान अथवा आंबा, पपई, सफरचंद आदी फळांची विक्री करत आहेत.लॉकडाऊनदरम्यान आर्थिक परिस्थिती कमालीची खालावली होती. त्यामुळे झालेली आर्थिक तूट भरून काढण्यासाठी व्यवसाय बदलावा लागला आहे.पाणीपुरीच्या व्यवसायासाठी दुकान भाड्याने घेतले होते. किमान त्याचे भाडे भरण्यासाठी तरी तूर्तास कांदे, बटाटे विकण्यास सुरुवात केली आहे, अशी माहिती व्यावसायिक मोहम्मद हैदर याने ‘लोकमत’ला दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस