शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

गुजराती भाषेतील बिलं व विजदरवाढीच्या निषेधार्थ विजबिले जाळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2018 17:05 IST

रिलायन्स एनर्जी कंपनी अदानी ग्रुपने घेतल्या नंतर विजेच्या दरात भरमसाठ वाढ करण्यात आल्याने आधीच लोकां मध्ये संताप आहे.

मीरारोड - भरमसाठ विज दरवाढ व गुजराती भाषेतुन विजबिले दिल्याच्या निषेधार्थ शिवसेनेने आज भार्इंदर येथील अदानी एनर्जीच्या कार्यालया समोर निषेध करत विजबिले जाळली.रिलायन्स एनर्जी कंपनी अदानी ग्रुपने घेतल्या नंतर विजेच्या दरात भरमसाठ वाढ करण्यात आल्याने आधीच लोकां मध्ये संताप आहे. त्यातच भार्इंदर मध्ये अदानीची विजबिलं गुजराती भाषेतुन दिली जात असल्याचे समोर आल्याने सोशल मिडीयावर टिकेची झोड उठली. गेल्या आठवड्यात मराठी एकीकरण समिती, जिद्दी मराठा संघटना आदींच्या पदाधिकारयांनी भार्इंदर येथील अदानी एनर्जीच्या अधिकारयांची भेट घेऊन निवेदन दिले. महाराष्ट्रात मराठी भाषेतुनच विजबिले द्यावीत अशी मागणी करत अदानी कंपनीचा निषेध केला होता.आज सोमवारी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, विरोधी पक्षनेते राजु भोईर, माजी उपनगराध्यक्ष अरुण कदम, नगरसेविका निलम ढवण, शर्मिला गंडोली, उपजिल्हा संघटक शंकर विरकर, प्रवक्ता शैलेष पांडे, शहरप्रमुख लक्ष्मण जंगम, राजकुमार चौरसिया आदींसह मोठ्या संख्येने जमलेल्या शिवसैनिकांनी भार्इंदर फाटक येथील अदानी कंपनीच्या कार्यालया बाहेर जोरदार निदर्शने केली. विजबिल कमी करा व मराठी भाषेतुनच बिले हवीत अशा घोषणा दिल्या.सरनाईक यांच्यासह शिष्टमंडळाने अदानी कंपनीच्या अधिकारयांची भेट घेऊन निवेदन दिले व विजबिल कमी करा आणि बिले मराठी भाषेतुनच द्या अशी मागणी केली. या वेळी अधिकारयांनी व्यवस्थापना कडे दोन्ही मुद्दे मांडुन कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आले.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर