शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्याचा सराईत चोरटा बदलापूरात जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 22:05 IST

अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर या परिसरात घरफोडी करणाऱ्या कैलास मोरे या सराईत चोरटयाला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या उल्हासनगर युनिटच्या पथकाने अटक केली. त्याच्याविरुद्ध घरफोडीचे ३२ गुन्हे दाखल असून त्यातील आठ गुन्हयांची उकल झाली आहे.

ठळक मुद्दे हत्यारांसह साडेपाच लाखांचा ऐवज हस्तगतघरफोडीचे ३२ गुन्हे दाखलचोरीचे आठ गुन्हे उघड

ठाणे : अंबरनाथ, उल्हासनगर आणि बदलापूर परिसरात घरफोडी करणा-या कैलास मोरे (३८, रा. सोनगीर, जि. धुळे)या सराईत चोरट्यालाठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या उल्हासनगर पथकाने नुकतीच अटक केली. त्याच्याकडून घरफोडीतील हत्यारांसह साडेपाच लाखांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केल्याची माहिती पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी दिली.उल्हासनगर परिमंडळ ४ मधील अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर या परिसरात घरफोडी करणाºया सराईत चोरट्याची माहिती उल्हासनगर युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांना मिळाली होती. तिच्या आधारे त्याला सापळा रचून १० आॅगस्ट रोजी बदलापूर पश्चिमेकडील एसटी स्टँडजवळील गांधी टेकडी येथून त्यांच्या पथकाने अटक केली. त्याने सिद्धीविनायक पार्क, बेलवली, बदलापूर पश्चिम या भागात दिवसाही चो-या केल्याची कबुली दिली. तो त्याच्या तीन साथीदारांच्या मदतीने कारने येऊन दिवसा बंद घराचे कुलूप तोडून रेकी करुन चोरी करायचा. त्याच्याकडील बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर भागातील चोरीचे आठ गुन्हे उघड झाले आहेत. यात चोरीला गेलेल्या तीन लाख ४० हजार किंमतीच्या ११३.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने तसेच दोन लाख १० हजारांची गुन्ह्यात वापरलेली कार आणि हत्यारे असा साडेपाच लाखांचा ऐवज त्याच्याकडून हस्तगत केला आहे. त्याच्यावर नालासोपारा, वसई, एमएचबी, बोरीवली, कस्तुरबा मार्ग, चारकोप, कुरार, पंतनगर , घाटकोपर, सिल्वासा आणि अहमदाबाद येथे घरफोडीचे ३२ गुन्हे दाखल आहेत. याशिवाय, धुळे जिल्ह्यातील मोहाडी पोलीस ठाण्यातही दरोड्याच्या तयारीचे दोन गुन्हे दाखल आहेत. नुकताच तो आर्थर रोड आणि धुळे मध्यवर्ती करागृहातून बाहेर आला होता. या गुन्ह्याचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण नावले हे करीत आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrimeगुन्हाtheftचोरी