शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

मुंबईतून येऊन भाईंदरमध्ये चोऱ्या: अट्टल चोरटयासह दोघे जेरबंद, २१ चोऱ्यांमधील ३६ लाखांचे सोने जप्त

By जितेंद्र कालेकर | Updated: December 24, 2019 22:33 IST

उपनगरी रेल्वेने मुंबईतील अंधेरी येथून येऊन ठाणे ग्रामीण भागातील मीरारोड तसेच भाईंदर चो-या करणारा अट्टल चोरटा राजेंद्र पाटील आणि त्याचा साथीदार रोहित रेशीम या दोघांनाही ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या काशीमीरा युनिटने अटक केली आहे. त्यांच्याकडून २१ चोºयांमधील ३६ लाख २० हजारांचे सोने आणि चांदीचे दागिने हस्तगत केल्याची माहिती ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी मंगळवारी दिली. सलग १५ दिवस सीसीटीव्हीद्वारे पाळत ठेवून पोलिसांनी या अट्टल चोरटयाला जेरबंद केले आहे.

ठळक मुद्दे ठाणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई सीसीटीव्हीच्या आधारे १५ दिवस तपास पथकाने ठेवली पाळत

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : मुंबईच्या अंधेरी उपनगरातून येऊन ठाणे ग्रामीण भागातील मीरारोड तसेच भाईंदरमध्ये चो-या करणारा अट्टल चोरटा राजेंद्र पाटील (३७, रा. हरका चाळ, अंधेरी पूर्व) आणि त्याचा साथीदार रोहित रेशीम (३०, रा. अंधेरी) या दोघांनाही ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या काशीमीरा युनिटने नुकतीच अटक करून २१ चो-यांमधील ३६ लाख २० हजारांचे सोने आणि चांदीचे दागिने हस्तगत केल्याची माहिती ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.गेल्या काही महिन्यांपासून मीरा भाईंदर परिसरात दिवसा घराचे कडी कोयंडे तोडून चो-या होण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली होती. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक डॉ. राठोड आणि अपर पोलीस अधीक्षक संजयकुमार पाटील यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे यांनी तपासासाठी काशीमीरा युनिटच्या पथकाची नियुक्ती केली होती. त्यानुसार चोरी झालेल्या घराच्या इमारतीच्या आवारातील तसेच रस्त्यांवरील उपलब्ध सीसीटीव्ही फुटेजच्या पडताळणी दरम्यान एक संशयित व्यक्ती चोरीनंतर बॅग पाठीला लावून भार्इंदर आणि मीरारोड रेल्वे स्टेशनकडे जाणा-या रेल्वेने जात असल्याचे आढळले. तो अंधेरी रेल्वेस्थानकात उतरत होता. तिथून पुढे तो कुठे जातो, याची माहिती उपलब्ध होत नव्हती. त्याच्या फोटोच्या आधारे सहायक पोलीस निरीक्षक प्रविणकुमार साळुंखे, विलास कुटे, उपनिरीक्षक चेतन पाटील, जमादार अनिल वेळे, चंद्रकांत पोशिरकर तसेच पोलीस हवालदार किशोर वाडीने, अर्जून जाधव, पोलीस नाईक सचिन सावंत खासगी तांत्रिक मदतनीस महेश कानविंदे यांनी मुंबई परिसरात रेकॉर्ड तपासणी करुन ओळख पटविण्याचे काम केले. अखेर अंधेरी रेल्वे स्थानकात उतरून तो कुठे जातो, याचा तपास करण्यासाठी ठाणे ग्रामीण पोलिसांनी अंधेरी रेल्वे स्थानकाच्या बाहेरील खासगी इमारतीच्या ठिकाणी २ डिसेंबर रोजी सीसीटीव्ही बसविले. त्याठिकाणी सचिन सावंत आणि पोलीस हवालदार अर्जून जाधव यांनी सतत १५ दिवस पाळत ठेवली. अखेर १७ डिसेंबर रोजी संशयित व्यक्ती अर्थात पटेल याला एका मोटारसायकलवर बसत असतांनाच फिल्मी स्टाईलने या दोन्ही कर्मचा-यांनी ताब्यात घेतले. त्याच्या बॅगेच्या झडतीमध्ये घरफोडी करण्याची हत्यारे मिळाली. सखोल चौकशीमध्ये त्याने मीरा भाईंदरमध्ये केलेल्या चो-यांची कबुलीही दिली. तो चोरीतील मालाची वाहने दुरुस्त करणाºया रोहित रेशीम याच्याकडे विल्हेवाट करीत होता. रोहितच्या मोटारसायकलच्या डीक्कीतून तसेच घरातून सोन्याचे दागिने हस्तगत केले. या दोघांनाही १८ डिसेंबर २०१९ रोजी अटक केली. त्यांना २५ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.* २१ गुन्ह्यांची कबुली२०१८ पासून राजेंद्र दिवसाच्या वेळी या चो-या करीत होता. त्याने आतापर्यंत २१ चोरीच्या गुन्ह्यांची कबूली दिली असून त्यातील ३६ लाख १० हजारांचे एक हजार ३० ग्रॅम वजनाचे सोन्याचे आणि दहा हजारांचे चांदीचे असे ३६ लाख २० हजारांचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.* बंद घरे हेरून करायचा टेहळणीराजेंद्र हा मीरा रोड भाईंदर भागातील लॅचऐवजी कडी कोयंडे असलेली बंद घरे हेरायचा. त्या घरांमध्ये केवळ दिवसा चोरी करून तो अंधेरीमध्ये रेल्वेने पसार होत होता. या दरम्यान तो त्याचा मोबाइलही बंद ठेवत होता. त्याने ठाणे ग्रामीणच्या नवघरमधील सहा, काशीमीरामधील तीन, नयानगर- सहा, भाईंदर - ५ आणि पालघर जिल्ह्यांतील तुळींज येथील एक अशा २१ चो-यांची कबुली दिली. दोन वर्षांपासून चोरी करीत असूनही तो एकदाही ठाणे ग्रामीण किंवा मुंबई पोलिसांच्या हाती लागला नव्हता. त्याच्याकडून आणखीही गुन्हे उघड होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.*अल्प किंमतीमध्ये सोन्याची विक्रीचोरीतील सोन्याच्या दागिन्यांची राजेंद्र हा रोहितकडे अल्प किंमतीमध्ये विक्री करीत होता. सर्वच दागिने त्याने रोहितकडे विकले होते. रोहितने काही दागिने स्वत:कडे तर काही दागिने गहाण ठेवून पैसे मिळविले होते. त्याने आतापर्यंत त्याच्याकडे किती दागिने ठेवले याचा तपास करण्यात येत आहे.

 विशेष पोलीस महानिरीक्षकांकडून बक्षिसथेट अंधेरीमध्ये खासगीरित्या सीसीटीव्ही बसवून सतत पाठपुरावा करून गेली महिनाभराच्या तपासानंतर राजेंद्र पटेल आणि त्याच्या साथीदाराला अटक करणा-या स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे आणि सहायक पोलीस निरीक्षक प्रविणकुमार साळुंखे यांच्या पथकाचे कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक निकेत कौशिक यांनी कौतुक केले असून या संपूर्ण पथकाला बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे. सीसीटीव्हीद्वारे सतत १५ दिवस पाळत ठेवून आरोपीला अंधेरी येथून जेरबंद करणारे पोलीस नाईक सचिन सावंत आणि पोलीस हवालदार अर्जून जाधव यांचा पोलीस अधीक्षक डॉ. राठोड यांनी मंगळवारी सत्कार केला.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीArrestअटक