शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

शेतबांधावर खत योजनेचा बोजवारा, बियाणे, खते पोहोचलीच नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 00:59 IST

शेतकरी शासनाची योजना न राबवता वैयक्तिक बी-बियाणे व खते घेत असल्याने कृषी विभागाची योजना म्हणजे भूलभुलैया असल्याचा आरोप शेतक-यांनी केला आहे.

वाडा : महाआघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या बांधावर बियाणे व खते पोहोचवण्याची अभिनव योजना अमलात आणली. मात्र, या योजनेत अनेक त्रुटी असल्याने शेतकऱ्यांना या योजनेऐवजी कृषी सेवा केंद्रावरून बियाणे व खते आणणे सोयीचे वाटत असल्याने शेतकरी शासनाची योजना न राबवता वैयक्तिक बी-बियाणे व खते घेत असल्याने कृषी विभागाची योजना म्हणजे भूलभुलैया असल्याचा आरोप शेतक-यांनी केला आहे.राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून बांधावर बियाणे, खते ही अभिनव योजना लागू केली. या योजनेंतर्गत गावातील १२ ते १५ शेतकºयांनी गट तयार करून या गटातील सहभागी शेतकºयांनी ज्याला जेवढे बियाणे, खते लागतात, त्याप्रमाणे मागणी करून पैसे जमा करून सर्व शेतकºयांनी एकदाच खते, बियाणे कृषी पर्यवेक्षकाच्या साहाय्याने खरेदी करायचे. त्यामुळे वाजवी दरात शेतकºयांना शेतीमाल मिळून वाहतूक खर्चाची बचत होते. या योजनेतून शेतकºयांना कुठलेच अनुदान मिळत नाही. तसेच, १२ ते १५ शेतकºयांना एकत्र आणून त्यांचा गट तयार करणे, त्यांची मागणी नोंदवणे, हे अवघड असल्याने शेतकरी ते न करता स्वत:च जाऊन कृषी सेवा केंद्रावरून बियाणे व खते खरेदी करताना दिसून येत आहेत.वाडा तालुक्यातील खरिवली, पालसई, आमगाव, केळठण, पाली, आंबिस्ते, गोºहे, चिंचघर, उज्जैनी, कुडूस, गुहीर, कोना, गारगाव, तिळसा, नेहरोली, परळी, मांडवा, खानिवली, मानिवली, वाडा आदी २० गावांमध्ये ही योजना राबवण्यात आली असल्याचे केवळ कागदी घोडे रंगवण्याचे काम तालुका कृषी कार्यालयाकडून करण्यात आल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. पेरण्या संपत आल्या तरी शेतकºयांच्या बांधावर बियाणे व खतांचा पत्ताच नाही. प्रत्येक शेतकºयाने बियाणे, खते आणून पेरण्या केल्याने या योजनेचा वाड्यात बोजवारा उडालेला आहे. या योजनेची अंमलबजावणी करणारे मंडळ अधिकारी, कृषी पर्यवेक्षक हे शेतावर ढुंकूनही बघत नसल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. कुडूस मंडळात घोणसई, मेट, नारे, वडवली, कोंढले, दिनकरपाडा, मुसारणे, सापरोंडे, उसर, उचाट ही गावे येत असून या एकही गावात बांधावर बियाणे, खते मिळाली नसल्याचे अनेकांनी सांगितले.>मोहोट्याचापाडा गाव कुडूस मंडळात येत असून या गावात कृषी सहायकांनी शेतकºयांना याबाबतची माहिती न दिल्याने येथील शेतकरी या योजनेपासून वंचित राहिले आहेत, असे शेतकरी भास्कर दुबेले यांनी सांगितले. तर, आघाडी सरकार बांधावर खते, ही योजना राबविण्यात सपशेल अपयशी ठरले असल्याचा अरोप भाजपचे नेते मंगेश पाटील यांनी केला आहे.>वाडा तालुक्यात या योजनेंतर्गत २१० क्विंटल बियाणे आणि ३९० टन खत बांधावर गेले आहे.- एल.के. राऊत, प्रभारी तालुका कृषी अधिकारी