शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

अंबरनाथमध्ये बैलगाडा शर्यतीच्या वादातून अंधाधुंद गोळीबार; 15 ते 20 राउंड फायर झाल्याचा अंदाज

By पंकज पाटील | Updated: November 13, 2022 17:37 IST

अंबरनाथमध्ये बैलगाडा शर्यतीच्या वादातून अंधाधुंद गोळीबार करण्यात आला आहे. 

अंबरनाथ : बैलगाडा शर्यतींचा मौसम सुरू होताच आता बैलगाडा शर्यतीवरून दोन गटातील वादावादी समोर येऊ लागली आहे. बैलगाडा शर्यतीच्या वादातूनच आज अंबरनाथच्या एका नामांकित हॉटेल समोर दोन गटात वादावादी झाली. या वादातूनच हॉटेल परिसरात अंधाधुंद गोळीबार करण्यात आला. सुदैवाने या गोळीबारात कोणीही जखमी झाले नाही. पनवेलमधील पंढरी फडके आणि कल्याणचे राहुल पाटील ही दोन नावे बैलगाडा शर्यतीत नेहमीच चर्चेत राहिले आहेत. गेल्या वर्षीचा मोसमात या दोन्ही गटातील बैलगाड्यांना प्रवेश नाकारण्यात आला होता. हे दोन्ही गट एकमेकांच्या विरोधात जाण्याची शक्यता असल्यामुळे ही दक्षता बाळगण्यात आली होती. मात्र आता बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू झाल्याने हे दोन गट पुन्हा एकमेकांच्या समोर उभे ठाकले आहेत. 

बैलगाडा शर्यती संदर्भात बोलवण्यात आलेला बैठकीत फडके आणि राहुल पाटील गटात मोठ्या प्रमाणात वाद सुरू झाले. त्यातूनच फडके गटाने पाटील गटावर अंदाधुंद गोळीबार केला. अंबरनाथच्या एमआयडीसीतील सुदामा हॉटेलजवळ गोळीबाराची ही घटना घडली. १५ ते २० गोळ्या झाडण्यात आल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. ही घटना कळताच  राहुल पाटील यांचे शेकडो समर्थक घटनास्थळी पोहोचले.

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस