शहरं
Join us  
Trending Stories
1
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
2
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
3
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
4
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
5
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
6
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
7
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
8
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
9
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
10
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
11
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
12
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
13
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
14
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
15
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
16
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
17
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
18
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
19
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 

बुलेट ट्रेनच्या कामाचा खड्डा ठरला जीवघेणा; खड्ड्यातील पाण्यात बुडून १२ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 11:44 IST

मुलाचा मृत्यू झाल्याने पांडे परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी : बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी कोपर गाव येथे खोदकाम केलेल्या खड्ड्यात पोहण्यासाठी गेलेल्या देवव्रत जुगेश पांडे (१२) याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना  सोमवारी सायंकाळी घडली. केंद्र सरकारच्या प्रकल्पाकरिता खणलेल्या खड्ड्यांभोवती कुठलेही संरक्षक कुंपण उभारले नव्हते. त्याचा मृत्यू झाल्याने पांडे परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 

देवव्रत हा कोपर येथील चंद्राबाई अनंत पाटील या शाळेत इयत्ता चौथीमध्ये शिक्षण घेत होता. सोमवारी इयत्ता चौथीची वार्षिक परीक्षा सुरू झाली. पहिला पेपर देऊन दुसऱ्या पेपरचा अभ्यास करण्यासाठी देवव्रत गावातील ट्यूशनला गेला होता. ट्यूशनवरून घरी परत आल्यावर तो आपला भाऊ आणि मित्रांसोबत कोपर येथे बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कॉलमसाठी खोदलेल्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात पोहायला गेला. मात्र, खड्डा खोल असल्याने देवव्रतचा मृत्यू झाला. देवव्रतचे वडील जुगेश पांडे हे रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मागील सहा वर्षांपासून जुगेश पांडे पत्नी, देवव्रत व आठ वर्षांचा सुनील यांच्यासोबत कोपर येथील एका चाळीत राहतात. मुलांच्या भविष्यासाठी जुगेश दिवस-रात्र रिक्षा चालवतात. मात्र, मुलाच्या दुर्दैवी मृत्यूने त्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला. 

जबाबदार कंपनीवर कारवाई करा : खा. म्हात्रेपीडित कुटुंबीयांची भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश म्हात्रे ऊर्फ बाळ्यामामा यांनी भेट घेऊन सांत्वन केले. पीडित परिवाराला न्याय मिळवून देण्यासाठी आपण त्यांच्या पाठीशी उभे राहू, अशी प्रतिक्रिया खासदार म्हात्रे यांनी दिली. खासदार म्हात्रे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. नारपोली पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून त्यांनी दुर्घटनेस जबाबदार असलेल्या कंपनी प्रशासनावर योग्य ती कठोर कारवाई करण्याची मागणी केली.  

टॅग्स :bhiwandiभिवंडीBullet Trainबुलेट ट्रेन