शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
2
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
3
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
4
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
5
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
6
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल
7
इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार
8
तरुणांना भाषणबाजी नको, रोजगार हवा! राहुल गांधी यांनी व्यक्त केली चिंता
9
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
10
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
11
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
12
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
13
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
14
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
15
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
16
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
17
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
18
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
19
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
20
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...

‘सूर्या’च्या पाइपलाइनसाठी १३१ एकर वनावर बुलडोझर; 'आरे'नंतर पुन्हा मोठी वृक्षतोड होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2019 06:25 IST

वन्यप्रेमी विरुद्ध सरकार वाद पेटण्याची शक्यता

नारायण जाधवठाणे : मेट्रो ३ च्या कारशेडसाठी मुंबईतील गोरेगाव येथील आरे कॉलनीतील वृक्षतोडीवरून सध्या सर्वत्र संताप व्यक्त होत असताना आता एमएमआरडीएच्या मीरा-भार्इंदर आणि वसई-विरार महापालिकेसह २७ गावांची तहान भागविण्यासाठीच्या सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी ठाणे आणि पालघर या दोन्ही जिल्ह्यांतील तब्बल १३१.५७ एकर जंगलांचा गळा घोटला जाणार आहे. यात १६ एकरहून अधिक जमीन संजय गांधी राष्ट्रीय कार्यक्षेत्रातील आहे. यामुळे आगामी काळात वन्यपे्रमी विरुद्ध एमएमआरडीए आणि सरकार असा संघर्ष पुन्हा एकदा उभा राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

पालघर जिल्ह्यातील सूर्या नदीवर बांधलेल्या धरणातून वसई-विरार महापलिकेसह परिसरातील २७ गावे आणि ठाणे जिल्ह्यांतील मीरा-भार्इंदर महापालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करण्यासाठी एमएमआरडीएने अडीच हजार कोटी रुपये खर्र्चून पाणीपुरवठा हाती घेतला आहे. नगरविकास विभागाने अलीकडेच या प्रकल्पाच्या अंमलबजावणीचे अधिकार एमएमआरडीएला प्रदान केले आहेत. त्यानंतर आता शासनाने ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील तब्बल १३१.५७ एकर वनजमीन या प्रकल्पांसाठी देण्यासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. यात खारफुटीचाही समावेश आहे.

८० एकर राखीव तर ४२ एकर संरक्षित वनांचा जाणार बळीविशेष यात ७९.६८ एकर राखीव वनजमीन तर ४१.७४ संरक्षित वनांचा समावेश आहे. तर ९.३ एकर जमिनीवर खासगी वने आहेत. राखीव वनांमध्ये १६ एकराहून अधिक परिसर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आहे.

मीरा-भाईंदर मनपाने वनपट्ट्यांना पोहोचली होती हानीमीरा-भाईंदर महापालिकेने यापूर्वीच पाइपलाइन टाकण्यासाठी संजय गांधी उद्यानातील संरक्षित वनपट्ट्यांवर अतिक्रमण केलेहोते. त्यामुळे ०.३९ हेक्टर जमिनीवरील वृक्षवेलींची नियमबाह्य कत्तल करून समांतर जलवाहिनी टाकल्याप्रकरणी मीरा-भाईंदरचे तत्कालीन आयुक्त आणि पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याबाबत येऊरच्या परिक्षेत्र अधिकाऱ्यांनी एप्रिल २०१५ मध्ये अहवाल पाठवूनही ठाणे आणि बोरीवली येथील मुख्य वनसंरक्षकांनी त्याबाबत अद्यापही कारवाई केली नसल्याचे उघड झाले आहे.ही कामे करणारया वनजमिनीतून पाइपलाइनसह लगतचे रस्ते, पाणी शुद्धीकरण प्रकल्प, बोगद्यांसह तत्सम कामे करण्यात येणार आहेत. यामुळे वनांमधून मोठ्या प्रमाणात दुर्मीळ वृक्षांची कत्तल होऊन अवजड वाहनांची वाहतूक वाढून वन्यजीवांना धोका पोहोचण्याची भीती व्यक्त होत आहे. यामुळे मुंबईतील आरे कॉलनीतील मेट्रो कारशेडवरून ज्याप्रमाणे वाद पेटला तसा या कामादरम्यान पेटण्याची शक्यता आहे.

टॅग्स :water transportजलवाहतूकthaneठाणे