शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
2
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
3
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
4
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
5
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
6
स्विगी, झोमॅटो सारख्या कंपन्यांच्या डिलिव्हरी बॉईजना सुरक्षा मिळणार! 'या' अटी पूर्ण कराव्या लागतील; नवीन नियम जारी
7
राहुल नार्वेकरांचा Video व्हायरल, "माझ्याशी पंगा घेताय.."; हरिभाऊ राठोड यांनीही केले गंभीर आरोप
8
ठाण्यात एकाच घरात दोन पक्ष! मुलगा शिंदेसेनेतून, आई राष्ट्रवादी (शरद पवार) कडून आमने-सामने
9
Shrejal Guleria : अभिमानास्पद! वडील सैन्यात सुभेदार, लेक बनली फ्लाइंग ऑफिसर; तिसरी पिढी देशसेवेसाठी सज्ज
10
Video: आरारारा... खतरनाक! जेसन होल्डरने टाकला अजब-गजब चेंडू, क्रिकेटविश्वात रंगलीये चर्चा
11
सूडाची भावना! खांबाला बांधलं, केसाला धरुन फरफटत नेलं; लव्हमॅरेज केल्यावर जावयाला मारहाण
12
पनवेलमध्ये 'मविआ'ला उमेदवारांनीच दिला झटका! ७ जणांची माघार, भाजपाचे किती उमेदवार बिनविरोध विजयी?
13
राष्ट्रवादीचा 'मास्टरस्ट्रोक'! डॉक्टर, इंजिनिअर्ससह उत्तर भारतीयांना संधी, मलिक म्हणाले...
14
महापौरांसह सर्व समित्यांचे अध्यक्ष मराठीच हवेत! 'महानगरपालिकेसाठी मराठीनामा' कुणी केला जारी?
15
कधी काळी सचिन तेंडुलकरची झोप उडवणारा गोलंदाज; आज क्रूझ शिपवर गाणी गाऊन उदरनिर्वाह
16
कल्याण-डोंबिवलीत महायुतीने मतदानाआधीच अर्धी लढाई जिंकली, तब्बल १९ उमेदवार बिनविरोध
17
Jalgaon Municipal Election 2026: भाजपा-शिंदेसेनेचा विजयाचा 'षटकार'! युतीचे १२ उमेदवार बिनविरोध, वाचा संपूर्ण यादी
18
'हिंसक निदर्शनांमध्ये अमेरिका इराणमध्ये घुसण्यास तयार'; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा
19
Viral Video: "बिहारमध्ये २०-२५ हजारांत मुली मिळतात", कॅबिनेट मंत्र्यांच्या पतीचं वादग्रस्त वक्तव्य
20
Uma Bharti : "लाजिरवाणं, अत्यंत कलंकित; आयुष्याची किंमत २ लाख..."; उमा भारतींचा भाजपाला घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

बिल्डरांनी जमिनी बळकावल्या, टीडीआरला कोणी विचारेना, घोडबंदर टॉवरच्या जंगलात आदिवासींची घुसमट

By अजित मांडके | Updated: September 14, 2023 07:28 IST

Thane News: घोडबंदर भागात १९९१ च्या कालावधीत आलेल्या अनेक बिल्डरांनी  ५-१० हजार रुपये एकर दराने शेतकऱ्यांच्या, आदिवासींच्या जमिनी घेतल्या. त्या जमिनींना आता लाखोंचा भाव आला आहे.

- अजित मांडकेठाणे - घोडबंदर भागात १९९१ च्या कालावधीत आलेल्या अनेक बिल्डरांनी  ५-१० हजार रुपये एकर दराने शेतकऱ्यांच्या, आदिवासींच्या जमिनी घेतल्या. त्या जमिनींना आता लाखोंचा भाव आला आहे; ज्या जागेवर असंख्य टॉवर्स उभे राहिले त्या आदिवासींना मात्र पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.  

नवीन ठाणे अशी ओळख असलेल्या घोडबंदर भागात पाणखंडा, ठक्कर पाडा, गोवणी पाडा, बामनाली पाडा, देवीचा पाडा, गायमुख कशेळी आदि प्रमुख आदिवासी पाडे आजही या भागात आहेत; पण काँक्रीटच्या जंगलात आक्रसून गेलेली. घोडबंदर परिसरातील फ्लॅट्सची किंमत लाखोंच्या घरात गेली. परंतु आदिवासींच्या नशिबी परवडच आहे. वाघबीळ, कासारवडवली, ओवळा, मोघरपाडा भागातील स्थानिकांच्या उरल्यासुरल्या जमिनी विकास प्रकल्पांसाठी घेतल्या जात आहेत. कोस्टलसाठी आता वाघबीळ आणि इतर भागातील भूमिपुत्रांच्या जमिनी घेतल्या. त्या बदल्यात टीडीआर दिला जात आहे; पण तो टीडीआर घेण्यास एकही बिल्डर येत नाही, असे शेतकरी सांगतात. मेट्रोच्या कारशेडसाठी मोघरपाडा येथील २५० एकरच्या आसपास जमीन घेतली जाणार आहे. परंतु, त्याचा मोबदलाच अद्याप दिला नाही. शेतकऱ्यांनी वॉटरफ्रंटसाठी जागा दिली. त्या बदल्यात स्थानिकांना व्यवसायाची संधी दिली जाणार होती. ती जागा महिला बचत गटाला दिल्याने रहिवासी नाराज आहेत.

मुख्य समस्या- दोन पदरी रस्ते आठ पदरी झाले असले तरी या ठिकाणी वाहतुकीची समस्या आहे तशीच. - मुख्य रस्त्यांबरोबरच अंतर्गत रस्त्यांची अवस्था फारशी चांगली नाही.- वाघबीळ गावात नव्याने इमारती उभ्या राहिल्या. त्यांच्या ड्रेनेजचे पाणी जाण्यासाठी नाले केले; पण ते अपूर्ण असल्याने तुंबलेले पाणी शेतकऱ्यांच्या जमिनीत जाते.

ना पाणी, ना वीज, ना स्मशानभूमी - वाघबीळ, कासारवडली आणि मोघरपाडा आदी भागात तीन स्मशानभूमी आहेत. परंतु कासारवडली स्मशानभूमीत ना पाणी, ना वीज, ना इतर कोणत्याही सुविधा. - मृत्यू झाल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यासाठी सरण उपलब्ध होत नाही. - मोघरपाडा स्मशानभूमीत इलेक्ट्रिक शवदाहिनी सुरू केली. परंतु त्याच्यावर टाकण्यात आलेल्या स्लॅबला गळती लागली.

एखाद्या शेतकऱ्याने समजा २००० साली आपली जमीन विकली असेल, तर त्याला तेव्हाच्या बाजार दरानुसारच मोबदला दिलेला आहे. परंतु आता जर शेतकरी किंवा स्थानिक मोबदला कमी मिळाला, असे म्हणत असेल तर ते योग्य ठरणार नाही.- जितेंद्र मेहता, जेव्हीएम ग्रुप तथा अध्यक्ष, एमसीएचआय, ठाणे

बिल्डरांनी आमच्या जागा कवडीमोल भावाने खरेदी केल्या. कोस्टल रोडसाठी जागा घेतल्या जात आहेत. त्या बदल्यात टीडीआर दिला जात आहे. वास्तविक पाहता समृद्धी महामार्गाप्रमाणे आम्हाला मोबदला मिळावा, अशी अपेक्षा आहे. मात्र टीडीआरला कोणी विचारत नाही. तो तसाच पडून आहे.- संतोष भोईर, भूमिपुत्र, वाघबीळपूर्वी शेती केली जात होती. परंतु आता शेती नावाला उरली आहे, आता केवळ लाल पटणीची (भाताचा प्रकार) शेती केली जाते. ती कुटुंबाच्या पोटाला जेमतेम पुरेशी आहे. वस्तीला चांगले पक्के रस्ते नाहीत, पाण्याची समस्या आहे, घोडबंदरचा विकास झाला; पण आम्ही तसेच राहिलो.- अमित भोईर, स्थानिक नागरिकमोघरपाड्यात स्मशानभूमीत एकाच वेळेस अधिक संख्येने मृतदेह आल्यास समस्या निर्माण होते. परंतु येणाऱ्यांचे हाल होऊ नयेत, यासाठी मोफत लाकडे पुरविण्याचे काम करीत आहे. त्यातून सेवा देण्याचा प्रयत्न आहे.    - राम ठाकूर, स्थानिक समाजसेवक

टॅग्स :thaneठाणे