भिवंडी : कारमध्ये प्रेयसीशी निकाह केल्याचा बनाव करून तीच्यावर वारंवार अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली असून आपली फसवणूक झाल्याची खात्री होताच पिडीत पोलीसांत प्रियकरा विरोधात तक्रार दिल्यानंतर प्रियकर फरार झाला आहे. अजहर अंन्सारी (२८)असे प्रियकराचे नांव असुन तो शहरातील गुलजारनगर मध्ये रहात आहे. तसेच शहरातील वीज कंपनीत कामास आहे. तो काम करीत असताना त्याची चार वर्षापुर्वी शहरातील तरूणीशी ओळख झाली.त्याने ओळखीचा फायदा घेत तीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. काही दिवसांनंतर त्याने तीच्याकडे शरीरसुखाची मागणी केली असता तरूणीने त्याला निकाह करण्याची अट घातली. तेंव्हा त्याने तीला किंमती गाडीत बसवून निकाह करण्याचा बनाव केला. तीला लॉजमध्ये नेऊन तीच्यावर अत्याचार केला. त्यानंतर निकाह केल्याची बतावणी करीत तीला वारंवार लॉजमध्ये नेऊन अत्याचार केल्याने ती दोन वेळा गर्भवती राहिली. तेंव्हा त्याने तीच्यावर दबाव टाकीत व मारहाण करीत गर्भपात करण्यास भाग पाडले. या घटनांमुळे पिडीतेस आपली फसवणूक केल्याची जाणीव होताच तीने शांतीनगर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन हकीकत सांगीतली.त्यावरून पोलीसांनी अजहर अंन्सारी याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. सदर गुन्ह्याप्रकरणी पोलीस त्यास अटक करण्यास गेले असता सध्या तो फरार झाला आहे. या घटनेने गुलजार नगर परिसरांत खळबळ निर्माण झाली आहे.
कारमध्ये निकाहचा बनाव; प्रेयसीवर अत्याचार करून प्रियकर फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 21:37 IST
भिवंडी : कारमध्ये प्रेयसीशी निकाह केल्याचा बनाव करून तीच्यावर वारंवार अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली असून आपली फसवणूक झाल्याची ...
कारमध्ये निकाहचा बनाव; प्रेयसीवर अत्याचार करून प्रियकर फरार
ठळक मुद्देकारमध्ये केला प्रेयसीशी निकाहचा बनावलॉजमध्ये नेऊन वारंवार अत्याचार फसवणूकीच्या जाणीवेनंतर प्रियकराविरूध्द गुन्हा