शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
7
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
8
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
9
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
10
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
11
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
12
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
13
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
15
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
16
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
17
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
18
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
19
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
20
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली

बीएसयूपीची रद्द केलेली ११८ कोटींची निविदा मंजूर; तीन महिन्यांत सत्ताधारी भाजपचे मतपरिवर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 23:56 IST

इमारतीच्या बांधकामांच्या निविदा असताना सर्व कामे राज्य दरसूचीपेक्षा जास्त दराने दिली आहेत.

धीरज परबमीरा रोड : मीरा-भाईंदर महापालिकेच्या बीएसयूपी योजनेच्या तीन इमारती बांधण्याच्या ११७ कोटी ९६ लाखांच्या बीयूएसपीच्या कामांना सत्ताधारी भाजपने स्थायी समितीमध्ये मंजुरी दिली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मार्चमध्ये या ठेकेदारास काम देऊ नये व काळ्या यादीत टाकावे, असा ठराव भाजपने केला होता. त्यामुळे अवघ्या तीन महिन्यांत भाजपला कोणती अर्थपूर्ण उपरती झाली? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मीरा-भाईंदर महापालिकेने काशीचर्च झोपडपट्टीमधील ४७१ आणि जनतानगर झोपडपट्टीतील चार हजार १३६ लाभार्थ्यांना इमारतींमध्ये पक्क्या घरांचे स्वप्न दाखवले. पण, विविध कारणे आणि पालिकेचा भोंगळ कारभार यामुळे ही योजना बारगळली. त्यातही केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर ही योजना बंद केल्याने अखेर पालिकेने कर्ज उभारून योजना पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. पण स्वत:ची राहती घरे तोडायला देऊन दहा वर्षे संक्रमण शिबिरात काढणारे नागरिक संतापलेले आहेत.

या योजनेतील इमारत क्रमांक ४, ५ व ७ च्या बांधकामासाठी पालिकेने निविदा मागवली. ही निविदा मंजुरीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने १६ मार्चच्या स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्ताव दिला होता. तिन्ही इमारतींची कामे सर्वात कमी दर भरणाऱ्या मे. शायोना कॉर्पोरेशनला देण्याची प्रशासनाची शिफारस होती. पण, सत्ताधारी भाजपने ही निविदा फेटाळून लावली होती. भाजपचे राकेश शाह यांनी ठराव मांडला व दिनेश जैन यांनी अनुमोदन दिले होते.

या ठेकेदारास आधीही बांधकाम साहित्याचे दर वाढल्याने ते वाढवून दिले असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे हा ठेकेदार काम पूर्ण करू शकणार नाही. म्हणून त्याला काळ्या यादीत टाकून नवीन निविदा काढा असे भाजपने ठरावात म्हटले होते. त्यावेळी मनमर्जीनुसार ठेकेदार आणि टक्केवारीचे समीकरण बसत नसल्याने भाजपने बीएसयूपी कामाची निविदा फेटाळून लावल्याचा संशय व्यक्त केला गेला. तर बीएसयूपीचे काम रखडणार असे नमूद करत तत्कालीन पालिका आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी सत्ताधारी भाजपने केलेला हा ठराव विखंडीत करण्यासाठी शासनाला पाठवला होता. 

२५ जूनच्या स्थायी समितीच्या बैठकीत मात्र सत्ताधारी भाजपने शायोना कॉर्पोरेशनची निविदा मंजूर केली. या ठेकेदारास इमारत क्रमांक ४ च्या कामासाठी ३५ कोटी ५५ लाख ७७ हजार; इमारत क्रमांक ५ च्या कामासाठी ३७ कोटी ५९ लाख ८१ हजार व इमारत क्रमांक ७ च्या कामासाठी ४४ कोटी ८१ लाख ७ हजार अशी मिळून एकूण ११७ कोटी ९६ लाख ६६ हजारांची निविदा मंजूर केली आहे.सभापती अशोक तिवारी यांनी भाजप नगरसेवकांच्या ठरावानंतर निविदा मंजुरीवर मोहर उमटवली. जास्त दराने दिली सर्व कामेइमारतीच्या बांधकामांच्या निविदा असताना सर्व कामे राज्य दरसूचीपेक्षा जास्त दराने दिली आहेत. इमारत क्रमांक ४ चे काम ८.२४ टक्के जास्त दराने; ५ चे काम ७.२४ टक्के जास्त आणि इमारत ७ चे काम ५.९३ टक्के जास्त दराने दिले आहे. तीन महिन्यांपूर्वी शायोना कॉर्पोरेशन काम पूर्ण करू शकणार नाही म्हणून काळ्या यादीत टाकून नवीन निविदा मागवण्याचा ठराव करणाºया सत्ताधारी भाजपाने अवघ्या तीन महिन्यांतच घूमजाव करत त्याच ठेकेदाराची निविदा मंजूर केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक