शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
2
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
3
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
4
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
5
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
6
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
7
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
8
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
9
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
10
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
11
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
12
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
13
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
14
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
15
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
16
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
17
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
18
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
19
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
20
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर

सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलालास अटक: दोन तरुणींची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2019 22:17 IST

चित्रपट आणि मालिकांमधील कनिष्ठ कलाकार तरुणींना पैशाचे अमिष दाखवून त्यांच्या मार्फतीने सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल युनेस लॉरेन्स याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली. या धाडीनंतर दोन तरुणींची सुटका करण्यात आली असून त्याच्याकडून एक कारही जप्त करण्यात आली आहे.

ठळक मुद्देठाणे गुन्हे अन्वेषणच्या अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षाची कारवाई कनिष्ठ कलाकारांमार्फत सुरु होते सेक्स रॅकेटठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ठाणे : मालिका तसेच जाहिरातीसाठी मॉडेलिंगचे काम करणा-या कनिष्ठ कलाकार तरुणींना पैशाचे अमिष दाखवून सेक्स रॅकेट चालविणा-या युनेस लॉरेन्स (४१, रा. पटेलवाडी, मालाड, मुंबई) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने बुधवारी अटक केली. त्याला ३० मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.ठाण्याच्या जांभळी नाका येथील ‘वैशाली हॉटेल’मध्ये युनेस हा काही मुलींना शरीर विक्रयाच्या व्यवसायासाठी आणणार असल्याची माहिती अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षाचे पोलीस हवालदार विजय पवार यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील, सहायक पोलीस निरीक्षक शीतल मदने, उपनिरीक्षक सुनिल चव्हाणके, जमादार अविनाश बाबरेकर, राजू महाले आणि हवालदार पवार यांच्या पथकाने सापळा लावून १९ मार्च रोजी रात्री ९.१५ वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून १९ आणि २३ वर्षीय दोन पिडीत तरुणींची सुटकाही करण्यात आली. तसेच त्याची कारही पोलिसांनी जप्त केली आहे. युनेसला यामध्ये मदत करणारा छायाचित्रकार पाली होळकर आणि कलाकारांचे मेकअप करणारी एक महिला अशा दोघांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी युनेस याच्यासह तिघांविरुद्ध ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे..................................असे ओढायचे तरुणींना जाळयामध्येयुनेस हा मालिकांमधील कलाकार तरुणींचे मेकअप करणा-या अंजली वर्मा (नावात बदल) हिच्या संपर्कात होता. तर अंजली ही छायाचित्रकार पालीच्या संपर्कामध्ये होती. युनेस आणि अंजली हे दोघे गरजू, गरीब कलाकार मुलींना जाळयात ओढण्यासाठी त्यांना पैशाचे अमिष दाखवायचे. एखादी मुलगी तयार झाली तर तिच्यासाठी युनेस गि-हाईक शोधण्याचे काम करायचा. अंजली अशा मुलींना ‘तयार’ करुन ती युनेसकडे पाठवायची. एका मुलीसाठी पाच हजारांची रक्कम ठरली तर तर त्यातील तीन हजार हे तिघे वाटून घ्यायचे. उर्वरित रक्कम या मुलीकडे सोपविली जायची. अशाच दोन मुलींचा सौदा करण्यासाठी युनेस ठाण्याच्या जांभळी नाका येथील हॉटेलमध्ये आला. त्यावेळी पोलिसांनी पाठविलेल्या बनावट गि-हाईकांच्या जाळयात तो अडकला आणि पोलिसांनी दोन मुलींची त्याच्या ताब्यातून सुटका केली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीSex Racketसेक्स रॅकेट