शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

घरातून पळालेला मुलगा पालकांकडे , पोलिसांनी काढली समजूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 00:35 IST

आई रागावली म्हणून १३ वर्षाच्या मुलाने घर सोडले. ते सोडल्यावर त्याने बदलापूर येथे राहणाºया आपल्या मावशीच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला.

बदलापूर : आई रागावली म्हणून १३ वर्षाच्या मुलाने घर सोडले. ते सोडल्यावर त्याने बदलापूर येथे राहणाºया आपल्या मावशीच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला. पण बदलापूर स्थानकात आल्यावर त्याला घर न सापडल्याने तो स्थानक परिसरात रडत बसला होता. अखेर एका रिक्षाचालकाने त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीपकुमार राजभोज यांनी त्या मुलाच्या पालकांचा शोध घेऊन त्याला त्यांच्याकडे सुपूर्द केले.परभणी येथील गणेशनगरमध्ये राहणारा इरफान शेख हा ८ वीमध्ये शिकतो. २६ आॅक्टोबरला आई त्याला रागावल्याने तो रागाच्या भरात घर सोडून निघून गेला. घर सोडल्यावर तो कोठे गेला याची माहिती त्याच्या आईला नव्हती. इरफान हा थेट परभणीहून मुंबईला आणि नंतर मुंबईहून बदलापूरमध्ये आला. बदलापूरमध्ये त्याची मावशी राहत असल्याने तो येथे आला. मात्र मावशीचे घर न सापडल्याने तो स्थानकात रडत बसला. ही बाब रिक्षाचालक मंगेश थोरात यांच्या लक्षात येताच त्यांनी लागलीच या मुलाला पोलीस ठाण्यात आणले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजभोज यांनी त्या मुलाची चौकशी केल्यावर तो मुलगा परभणीचा असल्याचे समोर आले.आई रागावल्याने घर सोडल्याचे त्याने सांगितले. मात्र पुन्हा घरी जाणार नाही असा हट्ट त्याने केला. पोलिसांनी त्या मुलाची समजूत काढत त्याच्या पालकांचा शोध घेतला. पालक बदलापूरमध्ये येत नाही तोपर्यंत या मुलाची देखरेखही पोलिसांनीच केली. इरफानची आई पोलीस ठाण्यात आल्यावर तिच्याकडे मुलाला सुपूर्द केले. इरफानची समजूत काढल्याने त्याच्या आईने पोलिसांचे आभार मानले.

टॅग्स :Policeपोलिस