शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
3
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
4
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
5
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
6
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
7
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
8
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
9
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
10
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
11
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
12
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
13
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
14
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
15
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
16
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
17
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
18
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
19
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
20
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख

बॉटल ओपनर संग्राहक विनायक जोशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2020 01:44 IST

जसे ओपनर लोकप्रिय झाले, तसे ओपनरच्या संग्रहाला देखील सुरुवात झाली. विनायक जोशी हे भारतातील संग्रहकातील अग्रणी असलेले बॉटल ओपनर संग्राहक.

- अभय फाटकशीतपेयाच्या काचेच्या बाटल्यांचे बूच फोडण्यासाठी वापरले जातात ते ओपनर. अमेरिकेमधील विल्यम पेंटर यांनी १८८९ मध्ये प्रथम काचेच्या बाटलीचे कॅप बनवण्याचा शोध लावला. नंतर १८९२ मध्ये ती कॅप उघडण्यासाठी एक ओपनर बनवला गेला. शीतपेय पिणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत गेले. त्यानुसार ओपनरची मागणी वाढत गेली आणि ते संग्रह करणाऱ्यांची संख्याही. ज्येष्ठ आणि अनुभवी काडेपेटी संग्राहक विनायक जोशी यांनीही काहीतरी आगळावेगळा संग्रह करण्याच्या उद्देशाने ओपनर जमवण्यास सुरूवात केली. जोशी यांच्या संग्रहात आज १२०० हून अधिक ओपनर असून त्यात विविध धातूंचे, प्लास्टिकचे आणि वेगवेगळ्या आकाराचे ओपनर आहेत. ४ सेंमी रुंद आणि १६ सेंमी लांबीचा स्पीड ओपनरही त्यांच्या संग्रही आहे.गरज ही शोधाची जननी आहे. अठराव्या शतकात अशीच एक गरज कारणीभूत बनली एका महत्त्वपूर्ण शोधासाठी. तो शोध होता विविध शीतपेयांच्या काचेच्या बाटल्यांची झाकणे उघडण्यासाठी लागणा-या ओपनरचा. १८८९ पर्यंत सोडा आणि इतर कारबोनेटेड (फसफसणाºया) शीतपेयांच्या बाटल्या बंद करण्यासाठी कॉर्कचे बूच किंवा लायटनिंग फास्टनर वापरून बंद केली जात होती. यात गॅस निघून जाणे आणि स्वच्छ करतानाच्या अडचणींचा सामना करावा लागत होता.अमेरिकेमधील विल्यम पेंटर या हरहुन्नरी शोधकर्त्याने १८८९ मध्ये प्रथम काचेच्या बाटलीचे धातूचे बूच किंवा कॅप बनवण्यासाठी प्रयोग केले आणि त्याचा शोध लावला. नंतर १८९२ मध्ये ती कॅप उघडण्यासाठी एक ओपनर बनवला. सुरूवातीला या कॅपचं नाव क्र ाऊन कॉर्क असं होतं.या धातूच्या कॅप अथवा बुचाला कंगोरे होते जे एखाद्या उलट राज मुकुटाप्रमाणे दिसत होते. त्यामुळे हे क्र ाऊन कॅप या नावाने प्रचलित झाले. पूर्वी २४ कंगोरे असलेल्या कॅप बनविण्यात आल्या. परंतु लवकरच २१ कंगोरे असलेल्या कॅप वापरात आल्या. अत्यंत कमी खर्चात कॅप आणि ओपनर तयार होत होते आणि त्याचवेळी अशा शीतपेयांची मागणी जगभर वाढत होती. क्राऊन कॅप आणि ओपनर या दोन्हीच्या वापरामुळे शीतपेय अधिक काळ टिकत होती. त्यामुळे शीतपेयांच्या व्यवसायात अचानक तेजी आली.जाहिरातदारांसाठी ही एक मोठी संधी होती. त्यांनी या ओपनरच्या दोन्ही बाजूने आपले नाव छापून जाहिरात करायला सुरुवात केली. या पहिल्या ओपनरला चर्च की ओपनर असं पडलं, कारण ते चर्चच्या मोठ्या दरवाज्याच्या चावीच्या आकाराशी मिळतेजुळते होते.जसे ओपनर लोकप्रिय झाले, तसे ओपनरच्या संग्रहाला देखील सुरुवात झाली. विनायक जोशी हे भारतातील संग्रहकातील अग्रणी असलेले बॉटल ओपनर संग्राहक. खरतर यांची ओळख एक जेष्ठ आणि अनुभवी काडेपेटी संग्राहक. खव्याच्या व्यवसायामुळे विनायक जोशी यांना अनेक ठिकाणी फिरायला लागायचं. प्रत्येक गावात अनेक प्रकारच्या काडेपेट्या दिसायच्या. त्यावरील रंगसंगती आणि त्यातील विविधता यामुळे आकर्षित होऊन काडेपेट्या जमवायला सुरुवात केली. केवळ जमवण्याबरोबरच काडेपेटीचा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न केला. हळूहळू इतर संग्रहकांशी ओळख झाली आणि आदानप्रदान होऊन संग्रहात भर पडली. प्रवासाचा छंद असल्याने परदेशातील काडेपेट्या जमवल्या. आज जोशी यांच्याकडे जगभरातील विविध आकाराच्या आणि वैशिष्ट्यपूर्ण ३० हजार काडेपेट्या आहेत. यात जगातील सर्वात छोटी म्हणजे १ सेंटीमीटर आणि जगातील सर्वात मोठी म्हणजे १ फूट एवढी मोठी काडेपेटी यांच्या संग्रहात आहे. छंदांची भावना जनमानसात रुजवण्यासाठी जोशी यांनी प्रदर्शन भरवून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. छंद जोपासणाºयांना संग्रह वाढवण्यासाठी योग्य मार्गदर्शन आणि मुक्त हस्ते मदत करण्यासाठी विनायक जोशी प्रसिद्ध आहेत.२०१६ मध्ये भरवलेल्या त्यांच्या काडेपेट्यांच्या प्रदर्शनात अनेक संग्राहक आले होते. त्यांच्याशी बोलताना असं जाणवलं की, आपला एखादा आगळावेगळा संग्रह असावा. नंतर घरात एक पितळेचा ओपनर नजरेस पडला आणि त्यांनी विचार केला आपण ओपनरचा संग्रह करू शकतो. मग सर्व मित्रमंडळी आणि नातेवाईकांना या नव्या छंदांची माहिती दिली. वेगवेगळ्या ठिकाणी चौकशी करून ओपनर जमवायला सुरुवात केली. नातेवाईक आणि मित्रमंडळी ही यात मदत करू लागली.जोशी यांच्या संग्रहात १२०० हून अधिक ओपनर असून त्यात अनेक धातू, प्लास्टिक आणि वेगवेगळ्या आकाराचे ओपनर आहेत. स्पीड ओपनर चपट्या आकाराचा स्टीलचा ओपनर असतो. जो अंदाजे ४ सेंमी रुंद आणि १६ सेंमी लांबीचा असतो.जलद गतीने बर्फातून बाटली खेचून काढण्यासाठी आणि उघडून देण्यासाठी हा ओपनर बार टेंडरकट काम करणाºयांमध्ये प्रसिद्ध आहे. जो स्पीड ओपनर, पॉपर, मंबा, बार की आणि सर्वात लोकप्रिय बार ब्लेड या नावाने ओळखला जातो. अशाप्रकारचे ३-४ ओपनर जोशी यांच्या संग्रहात आहेत. या आगळ्यावेगळ्या छंदाला शुभेच्छा. (लेखक संग्राहक असून द हॉबी सर्कलचे संस्थापक आहेत.) 

टॅग्स :thaneठाणेJara hatkeजरा हटके