शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

काका पुतण्याचे दोन्ही गट निवडणुकीआधीच ठाणे, कल्याणमधून रिंगणाबाहेर, आता शिंदेसेना विरुद्ध उद्धवसेना सामना

By अनिकेत घमंडी | Updated: April 3, 2024 13:08 IST

Maharashtra Lok Sabha Election 2024: ठाणे व कल्याण लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत यापूर्वी प्रत्येकवेळी शिवसेनेला अंगावर घेणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन गटांत विभागल्यानंतर आता महायुती व महाविकास आघाडीच्या राजकारणात दोन्ही गट ठाणे, कल्याण मतदारसंघ गमावून बसणार आहे.

- अनिकेत घमंडी डोंबिवली - ठाणेकल्याण लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत यापूर्वी प्रत्येकवेळी शिवसेनेला अंगावर घेणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन गटांत विभागल्यानंतर आता महायुती व महाविकास आघाडीच्या राजकारणात दोन्ही गट ठाणे, कल्याण मतदारसंघ गमावून बसणार आहे. ठाणे व कल्याणमधील लढाई ही शिंदेसेना विरुद्ध उद्धवसेना अशीच होणार असल्याचे स्पष्ट होत आहे. 

नव्या परिस्थितीत लोकसभा निवडणूक लढविता येणार नसल्याने शरद पवार गट व अजित पवार गटातील पदाधिकारी, कार्यकर्ते काहीसे अस्वस्थ आहेत. भविष्यातही शिंदे व ठाकरे गटातच राजकीय संघर्ष होणार असेल तर आपले राजकीय भवितव्य काय, हा पेच त्यांच्यासमोर उभा आहे. कल्याण लोकसभेतून २००९ मध्ये आणि त्या आधीही दिवंगत नेते वसंत डावखरे, २०१४ मध्ये आनंद परांजपे, २०१९ मध्ये ठाणे महापालिकेचे माजी नगरसेवक बाबाजी पाटील यांनी निवडणूक लढवली होती. मुळात हा युतीचा बालेकिल्ला असल्याने या ठिकाणी कधीही राष्ट्रवादी काँग्रेसचा निभाव लागला नाही. तिन्ही वेळेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा लाखोंच्या मताधिक्याने पराभव झाला होता. शिवसेनेत असताना एकदा परांजपे आणि दोन वेळा खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा पराभव केला होता.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत गेलेल्या आनंद परांजपे यांना या दोन्ही मतदारसंघात आता निवडणूक लढविता येणार नाही. कल्याण लोकसभा मतदारसंघातील मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघ वगळता अन्य पाचही विधानसभा मतदारसंघात शिंदे सेना व भाजपचे आमदार आहेत. 

कोणत्या गटात कोण आले?राष्ट्रवादीच्या शरद पवार यांच्या गटात आ. जितेंद्र आव्हाड, वंडार पाटील, सुधीर पाटील हे प्रमुख नेते आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आनंद परांजपे, अप्पा शिंदे, प्रमोद हिंदुराव हे प्रमुख नेते आहेत. माजी आमदार पप्पू कलानी कोणत्या गटात आहेत, हे अजून स्पष्ट झालेले नाही.

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४NCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेनाkalyan-pcकल्याणthane-pcठाणेAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवार