शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
2
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
3
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
4
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
5
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
6
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
7
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
8
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
9
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
10
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
11
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
12
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
13
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
14
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
15
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
16
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
17
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
18
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
19
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
20
भाई, बाळासाहेबांबद्दल नेमके काय झाले होते, सांगता का..?

दोन्ही काँग्रेसची आघाडी?

By admin | Updated: May 29, 2017 06:10 IST

मीरा-भार्इंदरमध्ये मोठी गळती लागल्याने पालिका निवडणुकीत आघाडी करण्याची तयारी दोन्ही काँग्रेसमध्ये सुरू झाली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कमीरा रोड : मीरा-भार्इंदरमध्ये मोठी गळती लागल्याने पालिका निवडणुकीत आघाडी करण्याची तयारी दोन्ही काँग्रेसमध्ये सुरू झाली आहे. आघाडी झाल्यास महापालिका निवडणुकीत एकत्र लढण्याची ही दोन्ही काँग्रेसची पहिलीच वेळ असेल. आघाडी झाल्यास काँग्रेस मोठ्या भावाची भूमिका बजावणार, हे निश्चित. दरम्यान, दोन्ही काँग्रेसने इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज मागवले आहेत. सध्याचे प्राबल्य असलेले प्रभाग व उमेदवारांची यादी तयार झाल्यावर त्यातून निवडून येण्याच्या क्षमतेप्रमाणे जागावाटप होण्याचे संकेत आहेत. महापालिकेची पहिली निवडणूक २००२ मध्ये झाली होती. त्यावेळी दोन्ही काँग्रेसमध्ये बहुतांश मैत्रीपूर्ण लढतच झाली होती. त्यानंतरही २००७ व २०१२ च्या पालिका निवडणुकीतही दोन्ही काँग्रेस स्वतंत्र लढल्या होत्या. पण, निवडणुकीनंतर मात्र २००७ मध्ये पहिल्या अडीच वर्षांसाठी झालेल्या महापौर व उपमहापौर निवडणुकीचा अपवाद वगळता दोन्ही काँग्रेसमध्ये आघाडी झाली होती. २०१२ च्या निवडणुकीत काँग्रेसचे २०, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे २७ नगरसेवक निवडून आले होते. परंतु, राष्ट्रवादीचे स्थानिक सर्वेसर्वा माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा हे आता समर्थक नगरसेवक-पदाधिकाऱ्यांसह शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. आधीच राष्ट्रवादीचे डझनभर नगरसेवक शिवसेना व भाजपात गेले आहेत. जिल्हाध्यक्ष मोहन पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारीही बाहेर पडले आहेत. त्यामुळे १५ वर्षे सत्तेत असणारी राष्ट्रवादी काँग्रेस शहरात नावाला उरली आहे. काँग्रेसची अवस्थाही शहरात वेगळी नाही. माजी आ. मुझफ्फर हुसेन यांच्याकडून डावलले जाणे वा कार्यपद्धतीबद्दल नाराजी व्यक्त करत अनेक ज्येष्ठांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. काँग्रेसच्या विद्यमान ९ नगरसेवकांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपा-सेनेत दाखल झाले. शहरात सध्या भाजपा विरुद्ध शिवसेना अशीच लढत रंगणार असल्याचे वातावरण आहे. त्यातच, ४ नगरसेवकांचा एक प्रभाग असल्याने दोन्ही काँग्रेसला येणारी पालिका निवडणूक फारच अवघड ठरणार आहे. त्या अनुषंगाने दोन्ही काँग्रेसला शहरात आपले अस्तित्व टिकवण्यासाठी आघाडीशिवाय पर्याय नाही.काँग्रेस आघाडीने मंजूर केलेली विकासाची कामेच आज शहरात सुरू आहेत. शहरातील सत्ताधारी भाजपाच्या भ्रष्ट व दडपशाही कारभाराला नागरिक कंटाळले आहेत. शहरहितासाठी दोन्ही काँग्रेसमध्ये आघाडीची चर्चा सुरू आहे. उमेदवारांची यादी आल्यानंतर जागावाटपाबाबत चर्चा करता येईल. - अनिल सावंत, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस शहर पुन्हा विकासाच्या प्रगतीपथावर न्यायचे असेल, तर दोन्ही काँग्रेसला आताच्या परिस्थितीत आघाडी करून निवडणूक लढवण्याशिवाय पर्याय नाही. आमची काँग्रेससोबत आघाडीची बोलणी सुरू झाली असून दोन्ही पक्षांचे नेते योग्य निर्णय घेतील. - जयंत पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस वरिष्ठ स्तरावर अजून आघाडीबाबत चर्चा झालेली नाही. पण, स्थानिक पातळीवर जिल्हाध्यक्षांकडून इच्छुक उमेदवारांची यादी आल्यावर आघाडीबाबत विचार करून निर्णय घेतला जाईल. - मुझफ्फर हुसेन, माजी आमदारच्काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल सावंत व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात प्राथमिक चर्चा सुरू झाली आहे. च्आघाडीसाठी सध्या ज्या पक्षाचा जास्त प्रभाव आहे, असे प्रभाग तसेच इच्छुक उमेदवारांची यादी तयार करून त्यातील निवडून येण्याची क्षमता असलेले उमेदवार ठरवून जागावाटपाचे सूत्र ठरवले जाण्याची शक्यता आहे. च्४ नगरसेवकांचा एक प्रभाग असल्याने ही निवडणूक दोन्ही काँग्रेसला कठीण जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरात आपले अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांना आघाडीशिवाय पर्याय राहिलेला नाही.