भिवंडी : येथील एका व्यापा-याच्या बहिणीचे फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत, दोन लाखांची खंडणी मागणा-या दोघांना भोईवाडा पोलिसांनी शनिवारी अटक केली. आदिल शेख आणि शोहेब अंसारी अशी आरोपींची नावे आहेत.शोहेब अन्सारी याचे दिवाणशा दर्गा परिसरातील एका तरु णीशी प्रेमसंबंध होते. त्याची माहिती त्याने मित्र आदिल याला दिली. त्यानंतर, या दोघांनी तरुणीच्या भावाला फोन करून बहिणीचे फोटो व व्हिडीओ शूटिंग व्हायरल करण्याची धमकी दिली आणि त्या बदल्यात दोन लाख रुपयांची मागणी केली.पीडित तरुणीच्या भावाने भोईवाडा पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली. या प्रकरणी खंडणीचा गुन्हा दाखल करत, पोलिसांनी आदिल व शोहेब यांना अटक केली आहे.
खंडणी मागणाऱ्या दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 05:16 IST