शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

मुलाच्या सुटकेसाठी खंडणी उकळणाऱ्यास सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2021 00:30 IST

अल्पवयीन मुलाच्या सुटकेच्या बदल्यात त्याच्या पालकांकडून एक लाखाची खंडणी उकळणाºया कलिम इशाक अन्सारी याला ठाण्याचे न्यायाधीश शैलेंद्र तांबे यांनी मंगळवारी सात वर्षांच्या सक्तमजुरीची तसेच दहा हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली.

ठळक मुद्दे ठाणे न्यायालयाचा निर्णय वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : अल्पवयीन मुलाच्या सुटकेच्या बदल्यात त्याच्या पालकांकडून एक लाखाची खंडणी उकळणाºया कलिम इशाक अन्सारी याला ठाण्याचे न्यायाधीश शैलेंद्र तांबे यांनी मंगळवारी सात वर्षांच्या सक्तमजुरीची तसेच दहा हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त कारावासाची शिक्षेचाही आदेश देण्यात आला आहे.पोखरण रोड क्र मांक दोन येथील एका रहिवाशाच्या १५ वर्षीय मुलाला २७ मार्च २०१५ रोजी अज्ञात व्यक्तीने अपहरण केले होते. या प्रकरणी त्यांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर १ एप्रिल २०१५ रोजी तक्र ारदारांच्या मोबाइलवर एका अनोळखीचा फोन आला होता. त्यानेच मुलाच्या सुटकेसाठी त्यांच्याकडे एक लाखाच्या खंडणीची मागणी केली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणे पोलिसांनी तत्कालीन सहाय्यक पोलीस आयुक्त भरत शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली तिघांना अटक केली. यामधील मुख्य आरोपीला उत्तर प्रदेशातून ताब्यात घेतले होते. आरोपींच्या अटकेनंतर मुलाचे त्यांनी अपहरण केले नसल्याचे समोर आले. पण, शिक्षा झालेल्या आरोपीने खंडणीची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. मुलगा सापडत नसल्याने याचा तपास ठाणे शहर पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाकडे दिल्यानंतर या पथकाचे प्रमुख तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांच्या पथकाने त्या मुलाला ३० जानेवारी २०१९ रोजी नवी मुंबईतील नेरूळ येथून शोधून पालकांच्या स्वाधीन केले. या तीन आरोपींपैकी एक जण अल्पवयीन होता. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यावर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाल्यावर हा खटला न्यायाधीश शैलेंद्र तांबे यांच्यासमोर मंगळवारी सुनावणीसाठी आला. त्यावेळी सरकारी वकील विनीत कुलकर्णी यांनी सादर केलेले पुरावे आणि साक्षीदारांची साक्ष ग्राह्य मानून कलिम इशाक अन्सारी यालाच दोषी ठरविण्यात आले. त्याला सात वर्षांची सक्तमजुरीची आणि दहा हजार रु पये दंडाची शिक्षा सुनावली.

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी