शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

शॉकींग! घरातून ब्ल्यूटुथचा हेडफोन नेला, १७ वर्षांच्या मुलाला विवस्त्र फिरवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2023 08:09 IST

व्हिडीओ व्हायरल : कळवा पोलिसांनी एकाच्या आवळल्या मुसक्या

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : हातउसने घेतलेले तीनशे रुपये परत देण्यासाठी तसेच घरातील ब्ल्यूटुथ हेडफोन घेऊन गेल्याच्या कारणाने १७ वर्षीय मुलाला कपडे काढून गंभीर मारहाण करण्यात आली. एवढ्यावर न थांबता त्याला कळव्यातील  बाजारपेठेत फिरवल्याचा धक्कादायक प्रकार व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे उघड झाला आहे. 

या प्रकरणी जखमी युवकाने केलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी मारहाण करणाऱ्या  तौसिफ खानबंदे याच्या मुसक्या आवळल्या असून त्याचा मित्र सामिल खानबंदे हा पसार झाल्याचे कळवा पोलिसांनी सांगितले.  कळवा येथे राहणारा जखमी युवक ज्या सोसायटीत राहतो, तेथे २१ नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी १:३० वाजण्याच्या सुमारास तौसिफ आणि त्याचा मित्र सामील खानबंदे हे दोघे आले. त्यावेळी तौसिफ याने जखमी मुलाला तू  माझ्या  घरी येऊन ब्लूटूथ हेडफोन घेऊन का गेलास, अशी विचारणा करीत शिवीगाळ केली. याचदरम्यान तौसिफ याने पीडित मुलाने घेतलेले हातउसने तीनशे रुपयांचीही मागणी केली. त्याने  पैसे देण्यास नकार दिला. याचाच राग मनात धरून तौसिफ याने अणकुचीदार हत्याराने या पीडित मुलाच्या डाव्या पायाच्या गुडघ्याखाली हल्ला केला. मला आताच पैसे पाहिजेत नाहीतर तुला सोडणार नाही, अशीही दमबाजी त्याने केली. तसेच त्याचा मित्र सामील यानेही पीडित मुलाला  हाताच्या चापटीने मारहाण केली. त्यानंतर तौसिफ याने युवकाच्या पॅन्टचा बेल्ट काढून त्याच बेल्टने त्याच्या पाठीवर मारहाण केली. 

फरार आरोपीचा शोध सुरू पीडित मुलाने केलेल्या तक्रारीनंतर कळवा बुधवारी पहाटे गुन्हा दाखल केला. त्यानंतर मारहाण करणाऱ्या तौसिफ याला सकाळी राहत्या घरातून अटक केली. मात्र, त्याचा मित्र पसार झाला असून पाेलिस त्याचा शाेध घेत आहेत. 

पैशांच्या वादातून हा प्रकार घडला. यामध्ये अल्पवयीन मुलाला मारहाण झाली आहे. मारहाण आणि व्हिडीओ बनवणारे अल्पवयीन नाहीत. या प्रकरणी एकाला अटक, तर दुसऱ्याचा शोध सुरू आहे. - कन्हैया थोरात, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कळवा पोलिस ठाणे

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी