शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

मीरा-भार्इंदरमधील भाजपाची मंडळे झाली कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 00:29 IST

मीरा-भार्इंदर शहर (जिल्हा) भाजपाने शहरातील एकूण १२ मंडळांची संख्या कमी करून ती १० वर आणण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला

भार्इंदर : मीरा-भार्इंदर शहर (जिल्हा) भाजपाने शहरातील एकूण १२ मंडळांची संख्या कमी करून ती १० वर आणण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. नवीन मंडळांत सक्रिय अध्यक्षांना डच्चू देत नव्या चेहºयांची वर्णी लावण्यात आल्याने पदमुक्त केलेल्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. यामुळे ते बंडाचा झेंडा हाती घेणार असल्याची चर्चा भाजपात रंगू लागली आहे.भाजपातील वरिष्ठांसह प्रदेशस्तरावरून कोणताही आदेश नसताना आमदार नरेंद्र मेहता यांनी शहरातील भाजपाच्या मंडळांची संख्या कमी केल्याचा दावा नाराजांकडून केला जात आहे. तसेच त्यात फेरबदल करण्याऐवजी त्यांनी त्यातून सक्रिय अध्यक्ष, पदाधिकाºयांना डच्चू देत मर्जीतील नवीन चेहºयांना संधी दिल्याचा आरोप नाराजांकडून केला जात आहे. यामुळे भाजपाने पालिका निवडणुकीतील बहुमतासाठीच आपला वापर केल्याची भावना नाराजांमध्ये निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे.तत्पूर्वी पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीची प्रक्रिया जिल्ह्यात सुरू झाल्याने शहरातील भाजपा मंडळांकडून पक्षाचे प्रभावी कार्य होत नसल्याचा सूर वरिष्ठ स्तरावरून आळवला जात असल्याने प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी काही दिवसांपूर्वी ठाणे येथे मीरा-भार्इंदरमधील भाजपा पदाधिकाºयांची बैठक बोलवली होती. त्यात त्यांनी पदाधिकाºयांची झाडाझडती केली.पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसह पुढील लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी पालिकेत निवडून आलेल्या प्रत्येक नगरसेवकासह पदाधिकाºयांना प्रत्येक केंद्राची जबाबदारी देण्याची सूचना दानवे यांनी मेहता यांना केली होती.या बैठकीला जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे, उपमहापौर चंद्रकांत वैती, स्थायी सभापती ध्रुवकिशोर पाटील, नगरसेवक सुरेश खंडेलवाल, माजी नगरसेवक आसीफ शेख, अनिल भोसले यांचा समावेश होता. त्यावेळी शहरात कार्यरत असलेल्या १२ मंडळांची संख्या कमी करून ती १० वर आणली. भविष्यात भाजपात बंडाची शक्यता वर्तवली जात आहे.ज्यांना मंडळांची जबाबदारी दिली आहे, ती प्रभारी असून त्यावर अद्याप कुणाचीही नियुक्ती केलेली नाही. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवीन प्रभारींना दिलेल्या जबाबदारीनुसार त्यांनी आपल्या मंडळातील कार्यकर्ते व पदाधिकाºयांच्या बैठका बोलवून त्याचा अहवाल वरिष्ठ स्तरावर पाठवण्याचे कार्य करणार आहेत. प्रसंगी स्थानिक स्तरावर त्याचा निर्णय घेतला जाऊन नवीन नियुक्ती केल्या जातील.- चंद्रकांत वैती, उपमहापौर

टॅग्स :BJPभाजपा