शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
2
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
3
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन
4
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
5
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
6
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
7
पीएम मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ तात्काळ हटवा; पाटणा उच्च न्यायालयाचा आदेश
8
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
9
Ind Vs. Pak Asia Cup: आशिया कपमधून बाहेर गेल्यास पाकिस्तानचं कंबरडं मोडणार, होणार 'इतक्या' कोटींचं नुकसान
10
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
11
अकोला हादरले! शासकीय रुग्णालयातच एकाची दगडाने ठेचून हत्या, शाब्दिक वादातून मित्रानेच घेतला जीव
12
NEET च्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या आरोपीचा पोलिसांकडून एन्काऊंटर
13
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
14
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
15
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
16
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
17
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान
18
५% व्याजावर ३ लाख रुपयांपर्यंतचं लोन; 'या' लोकांसाठी आहे मोदी सरकारचं मोठं गिफ्ट
19
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
20
कंपन्या जीएसटी रिकव्हरीच्या मुडमध्ये! २२ सप्टेंबरआधीच शाम्पू, साबण २० टक्के डिस्काऊंटवर विकू लागल्या... 

भाजपाच्या मनमानी कारभारामुळे ते नाराज माजी मंडळ अध्यक्ष सेना प्रवेशासाठी आतुर- आ. प्रताप सरनाईक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2017 18:04 IST

भाईंदर - मीरा-भार्इंदर शहर (जिल्हा) भाजपाच्या मंडळ अध्यक्षांना पक्षांतर्गत कार्यकारी नियुक्तीची प्रक्रिया १८ महिने लांब असतानाच स्थानिक नेतृत्वाने शहरातील १२ निष्ठावंत मंडळ अध्यक्षांना विश्वासात न घेता त्यांची परस्पर पदावरुन हकालपट्टी केली आहे.

राजू काळेभाईंदर - मीरा-भार्इंदर शहर (जिल्हा) भाजपाच्या मंडळ अध्यक्षांना पक्षांतर्गत कार्यकारी नियुक्तीची प्रक्रिया १८ महिने लांब असतानाच स्थानिक नेतृत्वाने शहरातील १२ निष्ठावंत मंडळ अध्यक्षांना विश्वासात न घेता त्यांची परस्पर पदावरुन हकालपट्टी केली आहे. भाजपाच्या या मनमानी कारभारामुळे नाराज झालेले ते माजी मंडळ अध्यक्ष आपल्या संपर्कात असुन ते सेनेतील प्रवेशासाठी आतुर झाल्याचा दावा सरनाईक यांनी लोकमतकडे व्यक्त केला आहे.भाजपाच्या स्थानिक नेतृत्वाने प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंच्या सल्ल्याचा आधार घेत कोणालाही विश्वासात न घेता मनमानी कारभार सुरु केला आहे. पालिका निवडणुकीत एकहाती सत्ता मिळविण्यासाठी इतर पक्षातील पदाधिका-यांना पदांचे व उमेदवारीचे गाजर दाखवून निष्ठावंतांची गळचेपी सुरु केली आहे. एकहाती सत्तेचा दुरुपयोग भाजपाकडून होत असून आपल्या शब्दालाच हुकूमी पत्ता ठरवून स्थानिक नेतृत्वाचा मनमानी कारभार चालला आहे. शहरातील विकासाला चालना देणारा विरोधकांचा ठराव बहुमताच्या जोरावर सत्ताधारी अमान्य करीत असुन प्रशासनाच्या मान्यतेलाही मातीमोल ठरवू लागले आहेत. प्रशासन देखील बेकायदेशीर व मनमानी कारभार चालविणा-या सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करीत आहेत. हेच दबावतंत्र भाजपाच्या स्थानिक नेतृत्वाने गटबाजीच्या नावाखाली अवलंबविण्यास सुरुवात केली आहे. पालिका निवडणुकीत निष्ठावंतांनी जीवाचे रान केले. परंतु त्यांना पराभूत करुन समर्थकांच्या विजयासाठी प्रयत्न झाल्याचा आरोप पक्षांतर्गत होऊ लागला आहे. अशातच त्या निष्ठावंतांना पक्षाच्या मुख्यप्रवाहातुनच बाजुला सारण्याची प्रक्रीया स्थानिक नेतृत्वाने केल्याचा आरोप सरनाईक यांनी केला आहे. ओखीप्रमाणेच नमो नमो चे वादळ संपुष्टात येऊ लागले आहे. ओखीने अनेकांचे नुकसान केले तर नमो च्या वादळाने देशातील सर्वांचेच नुकसान केले आहे. त्याची परफेड यंदाच्या जिल्हापरिषदांच्या निवडणुकीत मतदारांनी करण्यास सुरुवात केल्याचा दावा त्यांनी केला आहे. सत्तेचा माज आलेल्या भाजपापासुन मंडळ अध्यक्षपदावरुन पायउतार करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांनी काडीमोड घेण्याचा निर्णय घेतला आहे. रिकाम्या झालेल्या मंडळ अध्यक्षपदावर मर्जीतील व सांगकाम्याप्रमाणे कारभार करणाय््राांची वर्णी लावण्यात आल्याने त्या नाराज माजी मंडळ अध्यक्षांनी आपल्याशी संपर्क साधुन शिवसेनेत प्रवेश घेण्याची इच्छा व्यक्त केल्याचे सरनाईक यांनी सांगितले. यामुळे लवकरच भाजपातील त्या नाराजांचा सेनेत अधिकृत प्रवेश होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.