शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुम्ही सांगा फक्त, नरेंद्र मोदी मतांसाठी स्टेजवर नाचायलाही तयार होतील,' राहुल गांधींची टीका
2
‘केंद्रच्या कर्मचाऱ्यांचा डेटा गेला चीनकडे, देशातील गल्लीबोळाची त्यांना माहिती’, बड्या टेक तज्ज्ञाचा सनसनाटी दावा 
3
डॉक्टर तरुणी रात्री १.३० वाजता हॉटेलमध्ये आली होती; सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदाच समोर आले
4
रामकेशच्या हत्येचा फूलप्रूफ प्लॅन बनवला; मग खूनी गर्लफ्रेंडचं रहस्य कसं उघड झालं? पोलिसांनी सांगितली संपूर्ण कहाणी
5
भारताच्या डावपेचामुळे पाकिस्तानचं टेन्शन वाढलं; ८ हजार किमी सीमेवर युद्धाचं सावट, काय घडतंय?
6
IND vs AUS : सूर्याचं 'ग्रहण' सुटलं! हिटमॅन रोहितच्या क्लबमध्ये एन्ट्री; MS धोनीचा विक्रमही मोडला
7
Fact Check: कंडोममुळं तुंबली गर्ल्स हॉस्टेलची पाईपलाईन? व्हायरल व्हिडीओमुळे नको ‘त्या’ चर्चा!
8
मोठी बातमी! भारताकडे निघालेला रशियन तेलाचा टँकर समुद्रातून अचानक माघारी वळला; रिफायनरींची चिंता वाढली...
9
८ व्या वेतन आयोगाचा केव्हापासून मिळणार फायदा, संपूर्ण प्रक्रियेला किती वेळ लागणार? जाणून घ्या
10
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत दिसल्या स्क्वॉड्रन लीडर शिवांगी सिंग! 'त्या' एका फोटोने पाकिस्तानचा होईल जळफळाट
11
VIDEO: बकरीसोबत रील बनवत होती एक मुलगी, अचानक बकरीने जे केलं... पाहून तुम्हालाही येईल हसू
12
'कांतारा'फेम ऋषभ शेट्टीने साकारला होता 'घाशीराम', गाजलेल्या मराठी नाटकाशी आहे 'हे' कनेक्शन
13
आजोबांच्या संपत्तीवर नातवंडांचा जन्मसिद्ध हक्क नाही; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय, प्रकरण काय?
14
Mutual Funds मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचा होणार फायदा; सेबीचा नवा प्रस्ताव, गुंतवणूकदारांना काय मिळणार?
15
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
16
पाकिस्तान करणार हमासचा खात्मा? अमेरिकेची 'चलाख' खेळी; असीम मुनीर २० हजार सैन्य उतरवणार
17
इथं १ ग्रॅम घेताना घाम फुटतोय! मग ७ महिन्यात ६४००० किलो सोनं भारतात कोणी आणलं?
18
फक्त १० वर्षांच्या फरकाने तुमच्या SIP रिटर्न्समध्ये ४७ लाखांचा मोठा फरक; तोटा होण्याआधी गणित पाहा
19
Viral News: रस्त्यावरून खरेदी केले जुने बूट; ब्रँडचं नाव पाहिलं आणि किंमत तपासली; महिला झाली शॉक!
20
Guru Upasna: गुरु उच्च राशीत असेल तर उपासना कोणती करावी किंवा कशी वाढवावी? वाचा 

भाजपा कार्यकर्त्यांसाठी दूर महामंडळ अन् मुख्यमंत्रीही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 03:21 IST

डोंबिवली : भाजपा सत्तेत आल्यानंतर अच्छे दिन येतील, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांसह पक्षाच्या कार्यकर्त्यांना होती.

अनिकेत घमंडीडोंबिवली : भाजपा सत्तेत आल्यानंतर अच्छे दिन येतील, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांसह पक्षाच्या कार्यकर्त्यांना होती. पण जसजशा पुढील निवडणुका समीप येत आहेत तसतशी कार्यकर्त्यांमध्येच अच्छे दिन कधी येणार अशी चर्चा सुरु असून महामंडळांचेही गाजर दाखवल्याबद्दल नाराजी व्यक्त होत आहे. एकीकडे महामंडळ दूर असतांनाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचीही भेट होत नसल्याने नगरसेवक-कार्यकर्ते नाराज असल्याची उघड चर्चा आहे.नुकत्याच झालेल्या अधिवेशन काळात मनसेचे डोंबिवलीतील नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटले, पण तेथे गेलेल्या डोंबिवलीतील भाजपा कार्यकर्त्यांची मात्र मुख्यमंत्र्यांशी भेट होऊ शकली नसल्याची सल ‘लोकमत’शी बोलतांना जुन्या पदाधिकाºयांनी व्यक्त केली. ठाणे जिल्ह्यात कल्याण-डोंबिवलीमधून पक्षाला तीन आमदार, एक खासदार मिळाले. मुरबाडची आमदारकीही भाजपाने राखली. त्यामुळे कार्यकर्त्यांना अच्छे दिन येतील, अशी अपेक्षा होती. सत्तेची तीन वर्षे उलटली. पण अद्यापही महामंडळांचा निर्णय नाही, आता काय पदरी मिळणार? सर्वसामान्य मतदारांप्रमाणेच कार्यकर्त्यांनाही गाजरच मिळाल्याची चर्चा उघडपणे सुरु आहे. विशेषत: डोंबिवलीतील कार्यकर्ते नाराज झाले असून महामंडळ नाही, मुख्यमंत्र्यांची भेट नाही, फक्त कामंच करायचं का, असा सवाल कार्यकर्त्यांनी ‘लोकमत’कडे केला. आपल्या पक्षाची सत्ता येऊनही तिचे लाभ पोचत नसतील, तर कोणत्या तोंडाने मतदारांना समजावून सांगणार हा त्याचा प्रश्न आहे.२०१४ मध्ये लोकसभेला युतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी आणि त्यानंतर अवघ्या सहा महिन्यांनी विधानसभेमध्ये सत्ता येण्यासाठी कार्यकर्ते राबले. केंद्रापाठोपाठ राज्यातही भाजपाची सत्ता आली, त्यामुळे अच्छे दिन येणार अशी आशा निर्माण झाली. पण कल्याण-डोंबिवलीच्या २७ गावांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहा हजार ५०० कोटींच्या पॅकेजचे दाखवलेल्या गाजर उपक्रमाची कार्यकर्त्यांनीही आधी मजा लुटली, पण त्यानंतर त्यांच्यामध्येही आता तीन वर्षांनंतर सर्वसामान्यांप्रमाणेच आपल्यालाही गाजर मिळाल्याची भावना आहे. सध्या महापालिकेत भाजपाचे ४२ नगरसेवक आहेत. त्यांच्यात उत्साह टिकवण्यासाठी भाजपाच्या स्थानिक पक्षश्रेष्ठींना भरपूर काम करावे लागणार आहे. अनेक जण नाराज असून त्यांची मनधरणी करावी लागणार आहे.मध्यंतरी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेतील महापौरांसह शिवसेनेच्या नगरसेवकांसमवेत मुख्यमंत्र्यांची भेट घेत निधीच्या कमतरतेवर नाराजी व्यक्त केली होती. त्यापाठोपाठ मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही डोंबिवलीकरांना घेऊन जात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. पण बालेकिल्ला म्हणवल्या जाणाºया कल्याण-डोंबिवलीतील भाजपाच्या नगरसेवकांना मात्र मुख्यमंत्र्यांची भेट मिळत नसल्याने उघडपणे खंत व्यक्त केली जात आहे.जिल्हा परिषद, पंचायत समितीत ज्या पद्धतीचे राजकारण झाले ते पाहता पक्षाला जर पुन्हा यश मिळवायचे असेल तर आतापासून किमान प्रश्न समजून घेण्याची तयारी करायला हवी. पण ज्यांनी त्यासाठी वेळ देणे गरजेचे आहे ते मुख्यमंत्री शिवसेनेच्या नेत्यांना लगेच वेळ देतात. मनसेच्या नेत्यांना भेटतात, पण भाजपाच्या कार्यकर्त्यांना बेटण्यासाठी मात्र त्यांच्याकडे वेळ नाही, याबद्दलची तीव्र नाराजी पक्षात आहे.>ंकार्यकर्त्यांसाठी वेळ नाहीराज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नरेंद्र पवार, आमदार गणपत गायकवाड आदींसह भिवंडीचे खासदार कपिल पाटील हे मुख्यमंत्र्यांना सातत्याने भेटतात. चर्चा करतात. पण कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी भेटीगाठी का होत नाहीत असा सवाल कार्यकर्ते करतात. निधी नाही हे वास्तव असून त्यासाठी वरिष्ठांसमवेत चर्चा करणे आवश्यक असल्याचेही मत अनेकांनी व्यक्त केले.>दगाफटक्याची भीतीलोकसभा आणि त्यापाठोपाठ विधानसभा तोंडावर आल्या असून भाजपामध्ये असलेली खंत वाढत गेली तर मात्र पक्षाची कोंडी वाढेल. त्यातच विधानसभाही लोकसभेच्या निवडणुकांसोबतच घेतली; तर मात्र कार्यकर्त्यांना जोमाने काम करावे लागेल. तो उत्साह, जोश टिकवून ठेवण्यासाठी आतापासूनच विशेष प्रयत्न करावे लागतील. अन्यथा पक्षासमोरील अडचणी आणि अंतर्गत कुरबुरी वाढल्या तर निवडणुकांना सामोरे जाताना दगाफटका होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :BJPभाजपाdombivaliडोंबिवली