शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

भाजप राज्यात २०० हून अधिक जागा जिंकणार, चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2022 06:40 IST

येत्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली २०० हून अधिक जागा जिंकण्याचे आमचे ध्येय आहे

ठाणे :

येत्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली २०० हून अधिक जागा जिंकण्याचे आमचे ध्येय आहे, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. संघटनात्मक दौऱ्यानिमित्ताने बावनकुळे हे शनिवारी ठाण्यात आले होते, तेव्हा त्यांनी सहयोग  मंदिर येथे पत्रकारांशी संवाद साधला.

भारतीय जनता पक्ष हा राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे. पण आम्हाला राज्यात पक्षाची ताकद ५१ टक्के इतकी वाढवायची आहे.  प्रत्येक बूथवर १८ वर्षांवरील किमान नऊ मतदाराची नोंद करणे, महाविकास आघाडीच्या पंचवीस कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश व्हावा, असे लक्ष्य कार्यकर्त्यांना देण्यात आले आहे. यापूर्वीचे मुख्यमंत्री अडीच वर्षांपैकी १८ महिने मंत्रालयात गेले नाहीत, असा टोला बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. राज्यात मागील अडीच वर्षे पोषक वातावरण नव्हते. 

आगामी  २०२४ च्या  विधानसभा निवडणुकीत शिंदे आणि फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली २०० हून अधिक जागा जिंकण्याचे. तर लोकसभा निवडणुकीत ४५ जागा जिंकण्याचे आमचे लक्ष्य असल्याचे ते म्हणाले. सरकारचे काम लोकांपर्यंत पोहोचवू. आपल्या या दौऱ्याच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्याच्या समस्या आपण सरकारपर्यंत पोहोचवू, असेही बावनकुळे म्हणाले.

पवार-शिंदे भेट राजकीय नाहीशरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात झालेली भेट ही वेगळ्या  कारणासाठी असेल. पण काही जण मुद्दाम त्या भेटीची  वेगळी चर्चा करतात, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. शिवसेनेत उद्धव ठाकरे यांच्याकडून झालेल्या विश्वासघाताचा वचपा यापूर्वी शिंदे यांनी काढल्याचे ते म्हणाले.

भारत जोडो यात्रेत काँग्रेस फुटतेयराहुल गांधी यांची  भारत जोडो यात्रा  कार्यकर्त्यांनी नव्हे तर नेत्यांनी हायजॅक केली आहे, असा टोला बावनकुळे यांनी लगावला. गांधी यांची यात्रा महाराष्ट्रात येत असताना येथील  काँग्रेसचे नेते भाजपात प्रवेश करत आहेत. येत्या काही दिवसांत मोठे नेते प्रवेश करतील. या यात्रेत पक्ष वाढत नसून फुटतो आहे, अशी खिल्ली बावनकुळे यांनी उडवली.

टॅग्स :Chandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळे