शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

मीरा-भाईंदरमध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा हटवण्याचा भाजपाचा डाव; शिवसेनेने दिला इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2020 19:44 IST

महाराजांचा काशिमीरा येथील अश्वारूढ पुतळा मेट्रोच्या कामामुळे घोडबंदर येथे हलवण्यात येण्याचा विचार व हालचाली सत्ताधारी भाजपा करत असल्याचे बोलले जातेय.

मीरारोड - मीरा भाईंदर शहराचे प्रवेशद्वार असलेल्या काशीमीरा नाका येथील सर्वांचे आराध्य दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा हटवण्याचा घाट सत्ताधारी भाजपाने घातल्याच्या चर्चेमुळे शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आज शिवजयंती दिवशी आयुक्तांची भेट घेतली. महाराजांचा पुतळा हटवण्याचे मनसुबे कोणत्याही स्थितीत शिवसेना हाणून पाडेल असा इशारा देतानाच सदर पुतळयाच्या चौथऱ्याची उंची वाढवून परिसर सुशोभित करण्याची मागणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी केली.आयुक्त चंद्रकांत डांगे यांची आज आ. सरनाईक सह विरोध पक्षनेता प्रविण पाटील, सभापती तारा घरत, गटनेता हरिश्चंद्र आमगावकर, नगरसेविका निलम ढवण, राजु भोईर, स्नेहा पांडे, संध्या पाटील, वंदना पाटील ,कुसूम गुप्ता ,दिनेश नलावडे, अर्चना कदम , कमलेश भोईर , दिप्ती भट, भावना भोईर, शर्मिला बगाजी, हेलन गोविंद तसेच पदाधिकारी प्रभाकर म्हात्रे, स्नेहल सावंत, विक्र म प्रतापिसंग , शुभांगी कोटीयन, पप्पु भिसे, श्रेया साळवी आदी पदाधिकारी उपस्थित होते. नवनियुक्त आयुक्तांचे स्वागत करुन विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.महाराजांचा काशिमीरा येथील अश्वारूढ पुतळा मेट्रोच्या कामामुळे घोडबंदर येथे हलवण्यात येण्याचा विचार व हालचाली सत्ताधारी भाजपा करत असल्याचे बोलले जातेय. मात्र महाराजांचा काशीमीरा येथील पुतळा कुठल्याही परिस्थितीत तेथून स्थलांतरित करण्याचा विचार कुणीही करू नये. असा विचार सुद्धा केला तर त्याला शिवसेनेच्या रुद्रावताराला सामोरे जावे लागेल असा इशारा सरनाईक यांनी दिला.काशिमीरा नाका येथून शहरात मेट्रो येणार आहे. मेट्रो व उन्नत मार्गाचे काम सुरु आहे. याठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तेथेच कायम ठेवावा व महाराजांच्या पुतळ्याची उंची किमान २५ फुटांनी वाढवावी. पुतळ्याची उंची वाढवून त्याचे सुशोभिकरण करावे. शहरातून कुठूनही हा पुतळा दिसला पाहिजे. घोडबंदर किल्ला सुशोभीकरण करत असताना किल्ल्यात महाराजांचा नवीन पुतळा बसवावा असे सरनाईक यांनी सांगीतले.

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजShiv SenaशिवसेनाBJPभाजपा