शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यात भाजपला हव्या १८ पैकी १२ जागा; पालघरमध्येही हवा समाधानकारक वाटा

By अजित मांडके | Updated: September 22, 2024 10:45 IST

ठाणे जिल्ह्यात १८ विधानसभा जागांपैकी नऊ जागांवर भाजपला मागील निवडणुकीत यश प्राप्त झाले.

ठाणे : आगामी विधानसभा निवडणुकीत ठाणे, तसेच पालघर जिल्ह्यात जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी भाजपकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. ठाणे जिल्ह्यात १८ विधानसभा जागांपैकी नऊ जागांवर भाजपला मागील निवडणुकीत यश प्राप्त झाले. यावेळी किमान १२ जागांची भाजपची मागणी आहे. 

पालघर जिल्ह्यामध्ये मागील विधानसभा निवडणुकीत यश मिळाले नसले तरी लोकसभा निवडणुकीत भाजपचा खासदार विजयी झाला. साहजिकच पालघरमध्येही जागा मिळविण्यासाठी भाजपची धडपड सुरू आहे. ठाणे जिल्ह्यातील केवळ नऊ जागांवर समाधान न मानता जास्तीत जास्त जागा कशा पदरात पाडून घेतल्या जाऊ शकतात, याची चाचपणी भाजपकडून सुरू झाली.

ज्येष्ठ नागरिकांच्या मतांवर देणार भर

विधानसभानिहाय किती ज्येष्ठ मतदार आहेत, ते हेरून त्यांचे मतदान करवून घेण्यावर भर दिला जात आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या घरी जाऊन मतदान करून घेण्याबाबत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे.

अमित शाह ठाणे-पालघरला देणार भेटकेंद्रीय मंत्री अमित शाह यांनी ठाणे व पालघर जिल्ह्यांना भेट देण्याचे निश्चित केले आहे. विधानसभा निवडणुकीत ठाण्यात बाजी मारायचीच, असा चंग शहा यांनी बांधला आहे. 

जागांची तीन गटांत वर्गवारी  यावेळी महायुतीमध्ये अधिकाधिक जागा आपल्याकडे खेचून घेण्याकरिता भाजपने सर्व विधानसभा जागांची ‘अ’, ‘ब’, ‘क’ अशी तीन गटांत वर्गवारी केली. ‘अ’ श्रेणीच्या जागांवर भाजपचा दावा आहे.  ‘ब’ श्रेणीतील जागांवर भाजपचे मतदान वाढवण्याकरिता प्रयत्न राहणार आहे, तर ‘क’ श्रेणीतील जागांच्या ठिकाणी मतदानाचा टक्का वाढवण्यावर भर देण्यासाठी विधानसभानिहाय बैठकांचे सत्र सुरू आहे.  या बैठकांना जिल्हाध्यक्ष, मंडळ अध्यक्ष आणि महिला आघाडीच्या अध्यक्ष उपस्थित राहतात. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४thaneठाणेBJPभाजपा