- सदानंद नाईक, उल्हासनगरउल्हासनगर महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपाची युती झाली नाही, तर त्याचा सर्वाधिक फटका भाजपालाच बसणार आहे. विधानसभा निवडणुकीत मोदीलाटेवर स्वार झालेल्या भाजपाने शिवसेनेपेक्षा जास्त मते घेतली असली तरी आता ती लाट ओसरली आहे. त्यामुळे कोणाच्या मदतीशिवाय पक्षाला यश मिळणे कठीण आहे.सिंधी परिसरात भाजपा, तर मराठी परिसरात शिवसेनेचे वर्चस्व असून ओमी कलानी यांचे येथील राजकारणावर वर्चस्व आहे. येथील निवडणुकीत सिंधी-बिगरसिंधी वाद नेहमीच रंगतो. सिंधी समाजाच्या मतांवर कलानी, भाजपा व स्थानिक साई पक्षाची भिस्त आहे, तर बिगरसिंधी मतांवर शिवसेना, रिपाइं यांची भिस्त आहे. शिवसेना-भाजपा व रिपाइंची गेल्या पालिका निवडणुकीत महायुती होऊनही स्पष्ट बहुमत मिळाले नाही. त्यांना स्थानिक साई-गंगाजल पक्षाच्या पाठिंब्यावर पालिका सत्ता स्थापन करावी लागली. त्या बदल्यात साई पक्षाला महापौरपद द्यावे लागले होते. दोन वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत उल्हासनगरातून राष्ट्रवादीच्या ज्योती कलानी यांचा अवघ्या १८०० मतांनी विजय झाला आहे. कलानी भाजपात आले नाहीत व शिवसेनेने युती तोडली, तर सर्वाधिक फटका भाजपाला बसेल.
उल्हासनगरात भाजपाला फटका?
By admin | Updated: October 21, 2016 04:26 IST