शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

महापौरांच्या टिकेनंतर भाजपचा शिवसेनेवर पलटवार आरोग्य साहित्यासह कम्युनिटी किचनचा घोटाळा उघड करा, भाजपचे महापौरांना आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 15:05 IST

कोरोना बाधीत रुग्णांसाठी उभारण्यात येत असलेल्या रुग्णालयाच्या मुद्यावरुन आता शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगल्याचे चित्र आहे. शिवसेनेच्या वतीने महापौरांनी भाजपवर शाब्दीक वार केल्यानंतर भाजपने देखील जोरदार पलटवार केला आहे.

ठाणे : कोरोना रुग्णांसाठी महापालिकेच्या माध्यमातून ग्लोबल इम्पॅक्ट हब येथे रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु आता यावर राजकारण चांगलेच तापले आहे. भाजपने विरोध केल्यानंतर महापौरांनी भाजपला राजकारण न करण्याची विनंती केली होती. परंतु आता भाजपने शिवसेनेवर पलटवार करीत रुग्णालयासाठी नगरसेवक निधी का द्यावा असा सवाल केला आहे. आम्ही राजकारण करीत नसून आध कम्युनिटी किचन आणि आरोग्य साहित्य खरेदीत जो काही घोटाळा झाला आहे, तो आधी महापौर म्हणून आपण उघड करावा असे आव्हान भाजपचे गटनेते संजय वाघुले यांनी महापौरांना दिले आहे. तसेच या रुग्णालयासाठी आपला दवाखानाचा निधी द्यावा अशी मागणीही त्यांनी पुन्हा केली आहे.                         कोरोना रुग्णालयासाठी नगरसेवक निधी वापरण्याऐवजी आपला दवाखानाचा निधी वापरावा असे मत भाजपच्या नगरसेवकांनी व्यक्त केले आहे. त्यावरुन महापौर नरेश म्हस्के यांनी भाजपला शालजोडीतले लगावत हा विरोध केवळ राजकीय असल्याचा आरोप केला आहे. परंतु आता महापौरांनी केलेल्या प्रत्येक आरोपांचे खंडन भाजपने केले आहे. नगरसेवक निधी ऐवजी रुग्णालयासाठी आपला दवाखानाचा निधी पडून आहे, तो देण्यात यावा, अशी मागणी भाजपने लावून धरली आहे. हा निधी देऊ नये म्हणून तुमचे हात दगडाखाली अडकले आहेत का?, कोणाला कमिटमेंट केली आहे का? असे अनेक सवाल वाघुले यांनी आता उपस्थित केले आहे. दुसरीकडे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावलेली बैठक अनौपचारीक होती तर एमसीएचआयच्या आशर यांना का पाचरण करण्यात आले असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. शिवाय जे ६० लाख मिळणार आहेत, त्यातून शहराच्या किंवा प्रभागाच्या विकासाची कामे होणार आहेत. परंतु सध्या जी काही कोरोनाची परिस्थिती ओढावली आहे, त्यात पालिकेच्या उत्पन्नावर देखील परिणाम झाला आहे, त्यामुळे नगरसेवक निधीही रुग्णालयासाठी दिला तर भविष्यात निधी बाबत अडचणी निर्माण होतील असेही त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे राजकारण भाजपवाले नाही तर शिवसेन करीत असून शहरात जो आरोग्य साहित्य खरेदीचा आणि कम्युनिटी किचनचा घोळ उघडकीस आला आहे, त्याची आधी चौकशी करुन दोषीवर कारवाई करावी अशी मागणीही वाघुले यांनी केली आहे.              त्यात सदर रुग्णालयाचा आराखाडा अद्याप समोर आलेला नाही, नगरसेवक निधी व्यतीरिक्त इतर किती निधी खर्च होणार याचाही माहिती दिलेली नाही. त्यामुळे त्या कामी देण्यात येणार नगरसेवक निधी हा अपुरा आहे. त्यामुळे त्यासाठी आपला दवाखान्याचा निधी वर्ग करण्यात यावा अशी विनंतीही त्यांनी केली आहे. 

 

टॅग्स :thaneठाणेBJPभाजपाShivsena Anniversaryशिवसेना वर्धापनदिन