शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

रेशनिंग दुकानाची भाजपने केली पोलखोल, सर्व दुकानांची घेणार झाडाझडती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2021 03:03 IST

रेशनिंग दुकानाच्या धाडीत सर्वसामान्यांना मिळणारे धान्य जास्तीचे आले असताना नागरिकांना मात्र कमी धान्य दिले जात असल्याची गंभीर बाब भाजपच्या पाहणीत उघडकीस आली.

ठाणे  - रेशनिंग दुकानांतून सर्वसामान्यांना योग्य धान्य मिळणे गरजेचे होते. परंतु, गुरुवारी भाजपच्या महिला मोर्चाने ज्ञानेश्वरनगर परिसरातील गंगाधरनगर येथे टाकलेल्या रेशनिंग दुकानाच्या धाडीत सर्वसामान्यांना मिळणारे धान्य जास्तीचे आले असताना नागरिकांना मात्र कमी धान्य दिले जात असल्याची गंभीर बाब भाजपच्या पाहणीत उघडकीस आली. त्यामुळे आता असेच प्रकार शहरातील इतर रेशनिंग दुकानातून सुरू असण्याची दाट शक्यता असल्याने या दुकानाप्रमाणेच शहरातील इतर रेशनिंग दुकानांचीही पोलखोल केली जाईल, असा इशारा यावेळी भाजपच्या ठाणे शहर महिला अध्यक्षा मृणाल पेंडसे यांनी दिला.ठाण्यातील काही भागातील रेशनिंग दुकानांच्या विरोधात मागील काही दिवसांपासून भाजप महिला मोर्चाकडे तक्रारी येत होत्या. त्या अनुषंगाने गुरुवारपासून शहरातील सर्वच रेशनिंग दुकानांची पाहणी करून झाडाझडतीस सुरुवात केली आहे. त्यानुसार गुरुवारी पहिल्याच दिवशी गंगाधरनगर भागातील रेशनिंग दुकानाची पाहणी केली असता सदर दुकानदार हा जास्तीचे धान्य मिळत असतानाही सर्वसामान्यांना मात्र कमी धान्य देत असल्याची पोलखोल यावेळी महिला मोर्चाने केली. त्यानुसार या दुकानदाराने ही चोरी केली असल्याचे मान्य केले. त्यानंतर ज्यांचे धान्य कमी देण्यात आले होते. त्यांना बोलावून ते धान्य त्यांना दिले गेले. यावेळी महिला मोर्चाने या रेशनिंग दुकानदाराची चांगलीच कानउघाडणी केली. तसेच, शासनाने जी लिंक दिलेली आहे, त्यानुसार प्रत्येकाला ते मिळते आहे का? त्या लिंक विषयीदेखील सर्वसामान्यांना माहिती नाही, त्यामुळे त्यांच्यातही जनजागृती करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे. यामुळे रेशनिंग व्यवस्थेत सुधारणा अपेक्षित आहे. 

प्रत्येक नागरिकाला आपल्या हक्काचे धान्य मिळाले हाच आमचा प्रमुख उद्देश यामागचा आहे. त्यानुसार हा पाहणी दौरा केला. परंतु पहिल्याच झाडाझडतीमध्ये रेशनिंग दुकानदाराने धान्याचा काळाबाजार केला असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे आता शहरातील सर्व रेशनिंग दुकानांची पाहणी करून पोलखोल केली जाईल.- मृणाल पेंडसे, ठाणे शहर महिला अध्यक्षा, भाजप

टॅग्स :thaneठाणे