शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

काळा बाजार करणाऱ्या रेशनिंग दुकानांची भाजपा महिला मोर्चाने केली पोलखोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2021 20:25 IST

ठाण्यातील काही भागातील रेशनिंग दुकानांच्या विरोधात मागील काही दिवसापासून भाजप महिला मोर्चाकडे तक्रारी येत होत्या.

ठाणे : रेशनिंग दुकानांतून सर्वसामान्यांना योग्य धान्य मिळणे गरजेचे होते. परंतु गुरुवारी भाजपच्या महिला मोर्चाने ज्ञानेश्वर नगर भागातील गंगाधर नगर येथे टाकलेल्या रेशनिंग दुकानाच्या धाडीत सर्वसामान्यांना मिळणारे धान्य जास्तीचे आले असतांना नागरीकांना मात्र कमी धान्य दिले जात असल्याची गंभीर बाब  उघडकीसआली. त्यामुळे आता असेच प्रकार शहरातील इतर रेशनिंग दुकानातून सुरु असण्याची दाट शक्यता असल्याने या दुकानाप्रमाणोच शहरातील इतर रेशनिंग दुकानांचीही पोलखोल केली जाईल असा इशारा यावेळी भाजपच्या ठाणे शहर महिला अध्यक्षा मृणाल पेंडसे यांनी दिला.

ठाण्यातील काही भागातील रेशनिंग दुकानांच्या विरोधात मागील काही दिवसापासून भाजप महिला मोर्चाकडे तक्रारी येत होत्या. त्या अनुषंगाने गुरुवार पासून महिला मोर्चाच्या वतीने शहरातील सर्वच रेशनिंग दुकानांची पाहणी करुन झाडाझडती करण्यास सुरवात केली आहे. त्यानुसार गुरुवारी पहिल्याच दिवशी ज्ञानेश्वर नगर भागातील गंगाधर नगर भागातील रेशनिंग दुकानाची पाहणी केली असता सदर दुकानदार हा जास्तीचे धान्य मिळत असतांनाही सर्वसामान्यांना मात्र कमी धान्य दिले जात असल्याची पोलखोल यावेळी महिला मोर्चाने केली. त्यानुसार या दुकानादाराने ही चोरी केली असल्याचे मान्य केले.

त्यानंतर ज्यांचे धान्य कमी देण्यात आले होते. त्यांना बोलावून ते धान्य त्यांना दिले गेले. यावेळी महिला मोर्चाने या रेशनिग दुकानदाराची चांगलीच कान उघाडणी केली. तसेच, शासनाने जी लिंक दिलेली आहे, त्यानुसार प्रत्येकाला ते मिळते आहे का? त्या लिंक विषयी देखील सर्वसामान्यांना माहिती नाही, त्यामुळे त्यांच्यातही जनजागृती करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे. या पाहणी दौ:याच्या माध्यमातून केवळ महिलांना हक्काचे धान्य मिळते का नाही हाच या मागचा प्रमुख उद्देश असल्याचे महिला मोर्चाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

कोरोना काळात शुभम अग्रवाल आणि त्याच्या सहकाऱ्यांनी अनेक सर्वसामान्यांना त्यांचे हक्काचे रेशन मिळते का नाही, यासाठी खुप काम केले आहे. त्यामुळे त्यांना रेशनिंग दुकानांविषयी किंवा प्रत्येकाला किती धान्य मिळायला हवे याची माहिती आहे. त्यानुसार ते देखील या पाहणी दौऱ्यात यावेळी उपस्थित होते.

आमच्याकडे रेशनिंग दुकानांच्या बाबत तक्रारी आल्या होत्या. त्याची शहनिशा करण्यासाठी रेशनिंग दुकानांची झाडाझडती करण्यात येत आहे. प्रत्येक नागरीकाला आपल्या हक्काचे धान्य मिळाले हाच आमचा प्रमुख उद्देश या मागचा आहे. त्यानुसार हा पाहणी दौरा करण्यात आला. परंतु पहिल्याच झाडाझडतीमध्ये रेशनिंग दुकानदाराने धान्यचा काळाबाजर केला असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे आता शहरातील सर्व रेशनिंग दुकानांची पाहणी करुन पोलखोल केली जाईल. (मृणाल पेंडसे - ठाणे शहर महिला अध्यक्षा, भाजप)

टॅग्स :BJPभाजपाthaneठाणे