शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

भाजप नगरसेवकाविरोधात तक्रार दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 11:27 PM

काँग्रेसच्या सदस्यांना फोडण्याचा प्रयत्न, शिवसेनेच्या सदस्याही गोव्यात

मीरा रोड : मीरा-भार्इंदर महापालिकेच्या महापौर व उपमहापौरपदासाठी २६ फेब्रुवारीला होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपचे नगरसेवक फुटण्याची धास्ती असल्याने नगरसेवकांना गोव्याला हलवले आहे. काँग्रेसच्या नगरसेवकांना फोडण्याचा प्रयत्न करणारे भाजप नगरसेवक ध्रुवकिशोर पाटील यांच्याविरोधात नयानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.महापालिकेत भाजपचे ६१, शिवसेना २२ व काँग्रेस आघाडीचे १२ नगरसेवक आहेत. भाजपमधील असंतोषामुळे नगरसेवक फुटण्याच्या धास्तीने नगरसेवकांना गोव्याच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. शिवसेना व काँग्रेस महाविकास आघाडीचे ३४ नगरसेवक असून भाजपकडे स्पष्ट बहुमत असूनही त्यांना नगरसेवक फुटण्याची धास्ती आहे. त्यातच, आमदार गीता जैन व समर्थक नगरसेवकांनी माजी आमदार नरेंद्र मेहतांविरोधात आघाडी उघडल्यास भाजपला फटका बसण्याची चिन्हे आहेत.धास्तावलेल्या भाजप नेतृत्वाने आता काँग्रेस आघाडीचे नगरसेवक फोडण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यातूनच काँग्रेसच्या ज्येष्ठ नगरसेविका उमा सपार यांना फोडण्यासाठी पाटील यांनी सतत फोन करून आमिष दाखवण्यासह मानसिक त्रास दिल्याची तक्रार काँग्रेसने नयानगर पोलीस ठाण्यात केली आहे. शुक्रवारी रात्री काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अंकुश मालुसरे, कार्याध्यक्ष प्रमोद सामंत, नगरसेवक अनिल सावंत, राजीव मेहरा, माजी नगरसेवक शफिक खान, पदाधिकारी दीप काकडे आदींनी नयानगर पोलीस ठाण्यात पाटील यांच्याविरोधात तक्रार देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.सपार या ज्येष्ठ नगरसेविका असून त्या आजारी आहेत. असे असताना पाटील हे सपार व त्यांच्या मुलास सतत फोन करून भाजपला साथ देण्यासाठी आमिष दाखवत आहेत. पोलिसांनी ध्रुवकिशोर यांना फोन करून पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगितले असता आपण २६ फेब्रुवारी रोजी शहरात येणार असल्याचे सांगितले.दरम्यान, शिवसेनेच्या अनिता पाटील, काँग्रेसचे नरेश पाटील, काँग्रेस आघाडीचे अमजद शेख हे तिघे नगरसेवकही गोव्याला भाजप नगरसेवकांसोबत आहेत.सत्ता, संपत्तीसाठी लाचारभाजपकडे स्पष्ट बहुमत असताना त्यांना त्यांच्याच नगरसेवकांवर विश्वास नसल्याचे स्पष्ट होते. सत्ता आणि संपत्तीसाठी लाचार असणाºया भाजपच्या अशा नगरसेवकां बद्दल देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी खुलासा करून मीरा-भार्इंदरच्या जनतेची माफी मागावी, असे आवाहन मालुसरे यांनी केले आहे.उमा सपार या पूर्वीपासून परिचित असल्याने निवडणुकीत सहकार्य करा व आशीर्वाद असू द्या असे त्यांना सांगितले होते. कोणतेही आमिष दाखवले नाही किंवा त्रास दिला नाही. - ध्रुवकिशोर पाटील, नगरसेवक.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक