शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

धार्मिकस्थळांवरील कारवाईला भाजपाने केला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 03:54 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेने राज्य सरकारच्या निर्देशानुसार अनधिकृत धार्मिकस्थळे हटवण्याकरिता मीरा रोडच्या शांती पार्क व शांतीनगरातील १० ते १२ धार्मिकस्थळांना नोटिसा पाठवताच भाजपाच्या नगरसेवकांनी त्याला कडाडून विरोध करत आत्मदहनाचा इशारा दिला आहे.

मीरा रोड - मीरा-भार्इंदर महापालिकेने राज्य सरकारच्या निर्देशानुसार अनधिकृत धार्मिकस्थळे हटवण्याकरिता मीरा रोडच्या शांती पार्क व शांतीनगरातील १० ते १२ धार्मिकस्थळांना नोटिसा पाठवताच भाजपाच्या नगरसेवकांनी त्याला कडाडून विरोध करत आत्मदहनाचा इशारा दिला आहे. ही धार्मिकस्थळे अनेक वर्षांपासून अस्तित्वात असून त्यांच्या विकासात अडसर नसल्याने नोटिसा त्वरित मागे घ्या, अशी मागणी सोमवारी बैठकीत करण्यात आली. भाजपा नगरसेवक प्रशांत दळवी व सुरेश खंडेलवाल यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.मीरा रोड येथील शांती पार्क व शांतीनगर परिसरातील १० ते १२ मंदिरांची नावे कारवाई करण्याच्या धार्मिकस्थळांच्या यादीत असल्याने अतिरिक्त आयुक्त माधव कुसेकर यांनी ७ जूनला सुनावणी घेतली होती. कुसेकर यांनी स्थानिकांना डावलून भाजपाखेरीज इतर पक्षांतील तक्रारदारांनाच पाचारण केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. या एकतर्फी सुनावणीतून कारवाईचा निर्णय प्रशासनाने घेतल्याचा आरोपही त्यांनी केला. शहरात धार्मिक तेढ निर्माण करणारी ही कारवाई असल्याचा आरोप करत स्थानिकांनी सत्ताधारी भाजपाच्या लोकप्रतिनिधींकडे धाव घेतली.उपायुक्त (मुख्यालय) विजयकुमार म्हसाळ यांनी सोमवारी यासंदर्भात बैठकीचे आयोजन केले होते. त्यात स्थानिक रहिवाशांसह विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, भाजपाचे उपमहापौर चंद्रकांत वैती, स्थायी सभापती ध्रुवकिशोर पाटील, महिला व बालकल्याण समितीचे उपसभापती सीमा शाह, नगरसेवक सुरेश खंडेलवाल, प्रशांत दळवी, मोहन म्हात्रे, अनिल विराणी, नगरसेविका हेतल परमार, माजी नगरसेविका डॉ. नयना वसाणी आदी उपस्थित होते. अतिरिक्त आयुक्तांनी एकतर्फी सुनावणीतून घेतलेला कारवाईचा निर्णय त्वरित मागे घेऊन संबंधितांवर कारवाईची मागणी नगरसेवकांनी केली. आयुक्त बालाजी खतगावकर यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे म्हसाळ यांनी सांगितले.२८ धार्मिकस्थळे हटवलीशहरातील ७८ धार्मिकस्थळांची नावे यादीत समाविष्ट असून त्यातील १७ धार्मिकस्थळांना नियमित करण्यात आले आहे. २८ धार्मिकस्थळे हटवण्यात आली असून ३३ धार्मिकस्थळांवर कारवाई करणे अद्याप बाकी आहे. त्यात शांती पार्क व शांतीनगर येथील मंदिरांचा समावेश आहे. आता धार्मिकस्थळांवरून मीरा-भाईंदरमध्ये राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला जात असल्याने भविष्यात यावर चर्चा होणार असे बोलले जात आहे.

टॅग्स :BJPभाजपाMira Bhayanderमीरा-भाईंदर