शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
2
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
3
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
4
बालरोग विभागाच्या प्रमुखाकडून त्रास, ‘जे जे’मध्ये निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरूच! 
5
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
6
नोकरीचे प्रलोभन दाखवून तरुणीवर बलात्कार, आरोपीला अटक, ५ दिवसांची पोलीस कोठडी
7
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
8
केमोथेरपीमुळे कॅन्सर आणखी बळावण्याची भीती?; चिनी संशोधकांचा धक्कादायक दावा
9
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
11
लक्षात ठेवा, मी सांगतो तेच काम आणि कामाशिवाय दाम; विधिमंडळातील राड्यावर जनता नाराज
12
विधानसभा निवडणुकीत मविआच्या चुका झाल्या, उद्धव ठाकरे यांचे मत; अहंकारावरही बोट
13
शब्देविण संवादू... इमोजींची अकरा वर्षे: अबोल भावनांना मिळालेले 'रूप' आणि 'रंग'
14
त्या खासदार झाल्या, पण छळ काही थांबला नाही...; इंटर पार्लियामेंटरी युनियनचा धक्कादायक अहवाल
15
काँग्रेससोबत उत्तर भारतीयांना जोडण्यासाठी ‘मुंबई विरासत मिलन’ 
16
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
17
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
18
धक्कादायक..! छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
19
डेस्कटॉप पुन्हा फॉर्मात! वेगवान कामगिरी आणि सोयीमुळे मागणीत वाढ
20
ताक प्या आणि मस्त राहा! पण ताकासाठी दही कसं निवडावं? हेही जाणून घ्या

भाजपामुळे अवघ्या तीन वर्षांतच आणीबाणीची वेळ आली- राजेंद्र देवळेकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2017 18:47 IST

देशात आणीबाणी लागू करण्यासारखी परिस्थिती आणण्यासाठी काँग्रेसला 25 वर्षे लागली. मात्र आताच्या भाजप सरकारने अवघ्या तीन वर्षांत ती परिस्थिती निर्माण केल्याचे मत केडीएमसी महापौर राजेंद्र देवळेकर यांनी व्यक्त केले. राष्ट्रसेवा दल कल्याण-डोंबिवली यांच्यातर्फे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सध्यस्थिती या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.

कल्याण, दि. 24 - देशात आणीबाणी लागू करण्यासारखी परिस्थिती आणण्यासाठी काँग्रेसला 25 वर्षे लागली. मात्र आताच्या भाजप सरकारने अवघ्या तीन वर्षांत ती परिस्थिती निर्माण केल्याचे मत केडीएमसी महापौर राजेंद्र देवळेकर यांनी व्यक्त केले. राष्ट्रसेवा दल कल्याण-डोंबिवली यांच्यातर्फे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सध्यस्थिती या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच समाजकार्य आणि पत्रकारितेची 50 वर्षे पूर्ण केल्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार अण्णा बेटावदकर यांचा कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी देवळेकर बोलत होते.सार्वजनिक वाचनालयात आज हा कार्यक्रम पार पडला. बेटावदकर यांना 33 हजारांची रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकत्र्या इंदवी तुळपुळे, सामाजिक राजकीय कार्यकर्ते प्रमोद हिंदुराव, ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते संजीव साने , ज्येष्ठ पत्रकार बेटावदकर आणि त्यांच्या पत्नी प्रभा बेटावदकर , अश्विनी सातव-ढोके , राष्ट्रसेवा दलाचे  सुहास कोते आदी मान्यवर उपस्थित होते.देवळेकर म्हणाले, आम्ही त्यांच्याबरोबर सत्तेत असलो तरीही आमची  बांधिलकी जनतेशी आहे. जनतेला भेडसावणा-या प्रत्येक समस्येत आम्ही त्यांच्यासोबत आहोत. या देशात कोणत्याही राजवट आली तरी सामाजिक चळवळ जिवंत आहे, तोपर्यंत समाजाने घाबरण्याची गरज नाही. आपण आपला आवाज बुलंद करायला हवा. आपला आवाज बुलंद केल्यास देशाच्या स्वातंत्र्याला धोका निर्माण होणार नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले.

इंदवी तुळपुळे म्हणाले, सुरूवातीला आम्ही आदिवासी पाडय़ात जायचो तेव्हा तेथील लोक कोणत्याही प्रश्नाला उत्तर देत नसे. समाजाला व्यक्त होण्याची सवय व्हायला हवी आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यात तुम्ही -आम्ही आपला विशिष्ट विचार मांडले पाहिजेत. विचार करायचा आणि मांडायला स्वातंत्र्य आपल्याकडे नाही. या गोष्टीची मूळं कुठे आहेत हे शोधायची गरज आहे. सत्य बोला पण आवडणारे बोला. पण न आवडणारे असे खरे मात्र बोलू नका असे कुणी करते तेव्हा ते आवडत नाही. अप्रिय बोलून केलेले आक्रमण होते. त्यात ज्यांच्यावर आक्रमण होते. त्यांना त्यांचे उत्तर द्यावे लागते. विचार करायचं की नाही. प्रश्न विचारायचं की नाही या संस्कृतीत लहानपणापासून आपण वाढलो असतो. त्यांने आज हे टोक गाठले आहे. कोणती ही लहान मूल म्हणून कसे व्यक्त व्हावे हे आपल्या जीवनशैलीत दिसत नाही. मूलभूत गोची अशी आहे की, अभिव्यक्ती ही विचारांतून आली पाहिजे. विचारांचे स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य एकापाठोपाठ हातात हात धरून आले पाहिजे. आज सत्तेत असल्याने काहीही बोलले तरी आपण ते खपवून घेत आहे. विवेकवादी चिकित्सा करीत नाही, कोणाच्या भावना दुखत आहे का हे पण आपण पाहत नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्य पैश्यांचे बळ ज्यांच्या मागे आहे ते काहीही बोलले तरी चालते. आपले पुढारी बोलतात की गणपतीला हत्तीचे मुख लावले तर त्याकाळात अवयव प्रत्यारोपणाचे तंत्र अवगत होते. आदिवासी पाडय़ातील एका शाळेत न जाणा-या मुलांनी प्रश्न विचारले मळापासून गणपती बनविला तर किती दिवस आंघोळ केली नसेल. हे भयंकर बाहेर आले तर किती भयंकर परिस्थिती होईल. साधेसाधे प्रश्न माणसाला पडतात ते विचारण्याची सोय, संधी आणि परंपरा पुन्हा आणण्याची गरज आहे. आपला विचार पटला नाहीतर वाद घालू पण डोकी फोडणार नाही यासारखे काम करायला आमच्यासारख्या संघटना कमी पडल्या. प्रत्येकाने सहिष्णु असावे. मतभेद राहणार आहेत. पुढच्या समाज वेगळ्य़ा पध्दतीने घडावा अश्या पध्दतीने अभिव्यकती स्वातंत्र्याचा विचार व्हावा, असे ही त्यांनी सांगितले.