शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

भाजप सरकारने मराठयांचा विश्वासघात केला, भारिप प्रदेशाध्यक्षांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2018 13:47 IST

मराठयांच्या आरक्षणाचा निर्णय झालेला असतानाच भाजप सरकारने त्यासंदर्भातील प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी सुमारे 17 महिने लावले. त्यामुळेच मराठयांचे आरक्षण कोर्टात रेंगाळत पडले.

ठाणे - मराठयांच्या आरक्षणाचा निर्णय झालेला असतानाच भाजप सरकारने त्यासंदर्भातील प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी सुमारे 17 महिने लावले. त्यामुळेच मराठयांचे आरक्षण कोर्टात रेंगाळत पडले, असा आरोप भारिप-बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांनी केला. दरम्यान, काँग्रेसशी आघाडीची चर्चा सुरु असून लवकरच त्याबाबत निर्णय घेतला जाईल, असेही सोनोने यांनी सांगितले.भारिप बहुजन महासंघाच्या मेळाव्याचे ठाणे येथील एनकेटी सभागृहामध्ये आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये अशोक सोनोने बोलत होते. यावेळी  आमदार बाळाराम सिरस्कर, माजी आमदार हरिभाऊ भदे, ठाणे जिल्हा निरीक्षक रतन बनसोडे, कुशल मेश्राम, अमीत भुईगळ, डॉ. सुरेश शेळके, दशरथ भांडे, रााजाभाऊ चव्हाण, सुखदेव उबाळे, राजू मालवीय यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.अशोक सोनोने म्हणाले की, भारिपने सन 2019 च्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 358 तालुक्यांमध्ये मेळाव्यांचे आयोजन करण्यास सुरुवात केली आहे. या मेळाव्यांना मोठया संख्येने आंबेडकरी समुदाय  प्रतिसाद देत आहे. त्यामुळेच पक्षाचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी आगामी लोकसभा निवडणूकीत उमेदवार उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात काँग्रेसशी बोलणी सुरु आहेत. काँग्रेसने आम्हास प्रस्ताव दिला आहे. आम्ही लोकसभेच्या 12 जागा मागितल्या असून या बारा जागांवर मराठा, ओबीसी, एससी, एसटी, मुस्लीम अशा सर्वच जातप्रवर्गातील उमेदवारांना उभे करण्याचा पक्षाचा मानस आहे. जर, ही बोलणी यशस्वी ठरली तर ठिक अन्यथा, आम्ही स्वबळावर निवडणूक लढवणार आहोत.मराठा आरक्षणाबद्दल विचारले असता, देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात सत्ता मिळवताना खोटी आश्वासने दिली होती. आधीच्या आघाडी सरकारने आरक्षणाचा निर्णय घेतला होता. मात्र, त्याचे कायद्यात रुपांतर या सरकारने केले नाही. कोर्टामध्येही वेळेवर प्रतिज्ञापत्र सादर केले नाही. त्यामुळेच मराठा समाजाला रस्त्यावर उतरावे लागले आहे, असा आरोप  केला. 

टॅग्स :BJPभाजपाPoliticsराजकारण