शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी अखेर भाजप उतरला मैदानात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 00:48 IST

लोकसभा निवडणुकीसाठी ठाणे मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

ठाणे : लोकसभा निवडणुकीसाठी ठाणे मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे काही काळ नाराज असलेली भाजपची फळी आता त्यांच्या प्रचारासाठी जोमाने कामाला लागली आहे. प्रचाराच्या माध्यमातून भाजपची ही मंडळी आपला पट्टा सांभाळण्यावर भर देताना दिसत आहे.यामध्ये नगरसेवकांसह आमदारसुद्धा तितक्याच ताकदीने मैदानात उतरले आहेत. परंतु, ज्या पद्धतीने शिवसेनेच्या कार्यालयात प्रचाराची धामधूम दिसून येत आहे, तशी भाजपच्या एकाही कार्यालयात दिसत नाही. ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून राजन विचारे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपचे २३ नगरसेवक नाराज झाले होते. त्यांनी यासंदर्भात थेट मुख्यमंत्र्यांना पत्र पाठून आपली जाहीर नाराजी व्यक्त केली होती. विचारे यांच्याऐवजी दुसरा कोणताही उमेदवार द्या, त्याच्यासाठी काम करण्याची तयारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.

ठाण्याच्या गडातच भाजपच्या मंडळींनी ही भूमिका घेतल्याने शिवसेनेपुढील गणिते अवघड ठरण्याची चिन्हे दिसत होती. परंतु, भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी मध्यस्थी केली आणि काही गोष्टींवर चर्चा झाल्यानंतर या नाराज नगरसेवकांची मनधरणी करण्यात त्यांना यश आले. त्यानंतरही निघणाऱ्या प्रचार रॅलीतून या मंडळींचे प्रमाण कमी दिसत होते. परंतु, आता भाजप आमदारांनी शिवसेना उमेदवारासाठी प्रचारात आघाडी घेतली असून ठाण्यातील मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे नगरसेवकही टप्प्याटप्प्याने बाहेर पडू लागले असून उमेदवार कोणी असो, आम्हाला मोदींना पंतप्रधान करायचे असल्याने त्यासाठी आम्ही मतदारांपुढे मतांचा जोगवा मागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
>मित्रपक्ष जोमाने काम करतोयभाजप नगरसेवकांमध्ये असलेली नाराजी दूर झाली असून ती मंडळी खºया अर्थाने कामाला लागली आहे. प्रचार, सभा, मीटिंग आदींच्या माध्यमांतून ते प्रचारात सक्रिय झालेले आहेत.- राजन विचारे, शिवसेनाउमेदवाराच्या प्रचारासाठी आम्ही मैदानातपक्षाने आदेश दिले आहेत. त्यानुसार, आम्ही काम करत आहोत, मोदींना पंतप्रधान करायचे आहे. त्यामुळे भाजपची फळी आता जोमाने कामाला लागली आहे. रॅली, मीटिंग आदींच्या माध्यमातून प्रचार सुरू आहे.- संदीप लेले, अध्यक्ष, भाजप, ठाणे>विधानसभा मतदारसंघांतील मित्रपक्षांच्या कार्यालयांत काय दिसले?१. बेलापूर : या पट्ट्यात भाजपचे वर्चस्व दिसत असून येथे एक भाजप आमदार आहे. त्यामुळे शिवसेनेसाठी येथे जोमात प्रचार सुरू आहे. मात्र, कार्यालयात तसे वातावरण नाही.२. ऐरोली : ऐरोलीमध्ये भाजपचे तसे फारसे अस्तित्व दिसत नाही. तरीही जी थोडीफार भाजपची मंडळी आहे, ती प्रचारात उतरलेली दिसत आहेत.३. ठाणे : ठाण्यातील भाजपचे मध्यवर्ती कार्यालय ओस पडले असून त्याठिकाणी निवडणुकीची जराही धामधूम दिसून येत नाही. परंतु, प्रचारात मात्र येथे मुसंडी मारली आहे.४. कोपरी-पाचपाखाडी : कोपरी-पाचपाखाडीत भाजप आता सक्रिय होत असून येथे नगरसेवकांची कार्यालये आहेत. परंतु, त्याठिकाणीही फारशी हालचाल दिसून आलेली नाही.५. ओवळा-माजिवडा : या मतदारसंघात ठाण्याचा आणि काही मीरा-भार्इंदरचा भाग येत आहे. त्यामुळे येथेसुद्धा भाजपची मंडळी काम करताना दिसत आहे.६. मीरा-भार्इंदर : या पट्ट्यात भाजपचा एक आमदार असल्याने तो शिवसेनेसाठी जमेची बाजू मानली जात आहे. परंतु, त्यांच्या कार्यालयात निवडणुकीचा माहोल दिसत नाही.

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019thane-pcठाणे