शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे पालिकेवर भाजपचा झेंडा फडकवा; जनता दरबारापूर्वी भाजपने व्यक्त केली इच्छा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 08:38 IST

जनता दरबारावरून शिंदे सेनेचे पवार यांनी आगपाखड केली.

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : महापालिका निवडणुकामध्ये युती करायची का नाही याबाबत आमचे ज्येष्ठ नेते निर्णय घेतील. मात्र ठाणे महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकला पाहिजे, अशी प्रत्येक भाजप कार्यकर्त्याची भावना आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हेच स्पष्ट केले आहे, असा निर्धार भाजपने पुन्हा एकदा व्यक्त केला.

स्वबळावर सत्तेकरिता भाजप सक्रिय असल्याचे माजी खा. संजीव नाईक यांनी स्पष्ट केले. मंत्री गणेश नाईक यांच्या सोमवारी होणाऱ्या जनता दरबारवरून शिंदेसेना आक्रमक झाली. 

ठाण्यातील तिन्ही मंत्री जोमात! ठाण्यातील खारकर आळी येथे नाईक यांचा जनता दरबार होणार आहे. या पार्श्वभूमीवर संजीव नाईक यांनी शनिवारी ठाण्याच्या शासकीय विश्रामगृह येथे विविध अधिकाऱ्याशी संवाद साधत तयारीचा आढावा घेतला. ठाणे जिल्ह्यात तीन मंत्री असून तिघेही जोमाने काम करीत आहेत. आम्ही तिन्ही पक्ष मिळून लोकांचे प्रश्न सोडवत आहोत. ठाण्यातील दहा वर्षांनंतर पुन्हा जनता दरबाराचा अनुभव घेत आहे. अनधिकृत  बांधकामासंदर्भात नागरिकांना आपले म्हणणे मांडता येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शिंदेसेनेकडून आगपाखडजनता दरबारावरून शिंदे सेनेचे पवार यांनी आगपाखड केली. नाईक हे ज्येष्ठ नेते आहेत. परंतु ते हे विसरले की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मागे जनता आहे. शिंदे जेथे उभे राहतात, जेथे त्यांची गाडी थांबते तेथे त्यांचा जनता दरबार सुरू होतो. आनंद दिघे यांनी दरबार भरवण्याची प्रथा चालू केली आणि ती आजपर्यंत सुरू आहे. नाईक येथे जनता दरबार घेत आहेत. मग भाजपचे तीन वेळा निवडून आलेले आ. संजय केळकर जनतेची कामे करत नाहीत का, असा सवाल पवार यांनी  केला.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपा