शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा नगरसेवक जाणार कुर्गला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 03:02 IST

पर्यटनाची हौस भागवणार : खर्चाबाबत गौडबंगालच

मीरा रोड : नागरिकांवर लादलेली करवाढ, पालिकेवर कर्जाचा डोंगर, निधीअभावी विकासकामांना कात्री लावण्याची नामुष्की असताना करदात्या नागरिकांच्या पैशांनी पर्यटनस्थळी अभ्यासाच्या नावाखाली दौरे काढण्यावरून टीकेची झोड उठल्यावर पालिकेचा कर्नाटकचा कुर्ग दौरा रद्द झाला. मात्र सत्ताधारी भाजपा नगरसेवकांची हौसमौज भागवण्यासाठी ४ जूनला कुर्ग येथेच जाणार आहेत. भाजपाचे ६१ नगरसेवक असून कुर्ग सहलीचा खर्च अंदाजे ३० लाखांच्या घरात असल्याने हा खर्च नेमका कोण करणार? असा प्रश्न केला जात आहे.बहुतांश नगरसेवकांसह काही अधिकाऱ्यांना महापालिकेच्या अभ्यास दौºयाच्या नावाखाली नागरिकांच्या पैशातून विविध पर्यटनस्थळी मौजमजा करतात हे लपून राहिलेले नाही. देशातील विविध पर्यटनस्थळी काढल्या जाणाºया या दौºयांवर कोट्यवधींचा चुराडा होतो. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सर्व नगरसेवकांसाठी कुर्ग या पर्यटनस्थळी पालिकेचे तब्बल ४५ लाख रुपये खर्च करून दौरा काढला जाणार असल्याचे वृत्त ‘लोकमत’ ने देताच शहरात विविध स्तरातून या दौºयाला विरोध होऊ लागला. काँग्रेसने एकही नगरसेवक दौºयाला जाणार नाही म्हणून लेखी पत्र दिले. तर भाजपाच्या माजी महापौरांसह शिवसेनेच्या अनेक नगरसेवकांनीही दौºयाला येणार नसल्याचे पत्र दिले. मनसेसह काही संस्थांनी टीकेची झोड उठवत दौºयाला विरोध केला.दरम्यान, आधी बुकींग केलेली असल्याने एप्रिलमध्ये महिला बालकल्याण समितीचा दार्जिलींग येथे तर वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य नैनीताल - डेहराडून या पर्यटनस्थळी फिरून आले. त्यासाठी २० लाखांची उधळपट्टी करण्यात आली. या दौºयांवरून भाजपा एकाकी पडल्याने स्वत: आमदार नरेंद्र मेहता यांनी देखील कुर्ग दौरा आता नको अशी भूमिका घेतली. शेवटी महापालिकेने देखील कुर्ग दौरा रद्द केला.परदेश दौऱ्यांचा पॅटर्न वापरण्याची सूचनाभाजपातील काही नगरसेवक , पदाधिकारी यांनी मात्र कुर्ग दौºयाला जायचा हट्टच धरल्याचे सूत्रांनी सांगितले. पालिकेच्या खर्चातून न जाता स्थायी समिती सदस्य अन्य मार्गाने निधी उभारुन जाणाºया परदेश दौºयांचा पॅटर्न वापरा अशा सूचनाही दिल्याचे समजते. अखेर, भाजपा नगरसेवकांसाठी कुर्गला सहल काढण्याचे निश्चित झाले. त्यानुसार ४ जूनला नगरसेवक, पदाधिकारी हे विमानाने रवाना होणार असून ७ जूनला परतणार आहेत. या सहलीचा खर्च सुमारे ३० लाखांच्या घरात असून तो कोण करणार? असा प्रश्न केला जात आहे. तर काही कंत्राटदार, बिल्डर किंवा टेंडरमधून हा खर्च भागवला जाण्याची चर्चा असली तरी भाजपाकडून मात्र खर्चाबाबत वेगवेगळी माहिती दिली जात आहे.

टॅग्स :BJPभाजपाtourismपर्यटन