शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांविरोधात भाजपा नगरसेवक?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 02:37 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत: २७ गावांच्या स्वतंत्र नगरपालिकेसाठी सकारात्मक असताना त्यांच्याच पक्षाचे काही नगरसेवक स्वतंत्र नगरपालिका नको, अशी भूमिका घेत आहेत.

- अनिकेत घमंडीडोंबिवली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत: २७ गावांच्या स्वतंत्र नगरपालिकेसाठी सकारात्मक असताना त्यांच्याच पक्षाचे काही नगरसेवक स्वतंत्र नगरपालिका नको, अशी भूमिका घेत आहेत. हे कितपत योग्य आहे, असा सवाल संघर्ष समितीचे सरचिटणीस चंद्रकांत पाटील यांनी केला. भर पावसाळ्यात बारवी धरण ओव्हरफ्लो झाले असताना २७ गावांमध्ये मात्र पाणीटंचाई आहे. त्यामुळे या महापालिकेत राहायचे तरी कशाला?, असा सवालही त्यांनी केला.मागील आठवड्यात २७ गावांतील काही नगरसेवकांनी एकत्र येत केडीएमसीत राहण्यासाठी बैठक घेतली होती. पण त्यावेळी २७ गावांमधील सगळेच नगरसेवक हजर नव्हते. एका नगरसेविकेने तेथेही संघर्ष समितीचा मुद्दा लावून धरत स्वतंत्र नगरपालिका झालीच पाहिजे, अशी आग्रही भूमिका मांडली. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात फडणवीस यांनी २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे जाहीर केले होते. मात्र, त्यांच्या भूमिकेलाच काही नगरसेवक विरोध करत असतील तर फडणवीस यांनी त्याची गंभीर दखल घ्यावी, असेही पाटील म्हणाले.२७ गावांमधून जेवढा महसूल मिळतो, तेवढ्याच रक्कमेची अमृत योजना आहे. स्वतंत्र नगरपालिका झाल्यावर आम्हीही ती राबवू शकतो. केडीएमसीने तीन वर्षांत आम्हाला दिले तरी काय?, ग्रामस्थांना पुरेसे पाणी मिळत नसल्याने ते पावसाचे पाणी साठवून दिवस ढकलत आहेत. पण महापालिका मात्र पाणी देऊ शकत नाही, ही शोकांतिका आहे. ग्रामपंचायत काळात येथे २४ तास पाणी होते. आरोग्य सेवा नाही, चांगले रस्ते नाहीत, यामुळे ग्रामस्थांचे हाल होत आहेत.मुख्यमंत्री त्यांचा शब्द नक्की पाळतील, असा विश्वास आहे. संघर्ष समितीचा पाठपुरावा योग्य दिशेने सुरू आहे. लवकरच नगरपालिका झाली की नवी दिशा, नवा मार्ग मिळेल. ग्रामस्थांना सर्वतोपरी सुविधा दिल्या जातील असेही पाटील म्हणाले.‘त्या’ सुविधा स्वप्नवतच२७ गावांमधील शाळा अजूनही जिल्हा परिषदेकडून केडीएमसीकडे वर्ग झालेल्या नाहीत. त्यामुळे त्या शाळांचा खर्चही जि. प. करतआहे. आरोग्य केंद्रेही जि. प. च्या ताब्यात आहेत.महापालिका पायाभूत सुविधा पुरवू शकत नसताना तेथे विरंगुळा, मनोरंजनाच्या सुविधा या तर स्वप्नवतच आहेत. त्यामुळे स्वतंत्र नगरपालिका होणेच आवश्यक आहे, यावर पाटील ठाम आहेत.

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीBJPभाजपा